नवी दिल्ली : प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी मोटोरोला इंडिया (Motorola) ने भारतीय बाजारात आपला नवीन प्रिमियम झेड2 फोर्स (Z2 force) लॉन्च केलाय. कंपनीने जेड२ फोर्सला शटर प्रूफ डिस्प्लेसोबत सादर केलंय. ही या स्मार्टफोनची खासियत आहे. कंपनीने काही देशांमध्ये याआधीच हा फोन लॉन्च केलाय.  


कसं आहे प्रोसेसर?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीने हा फोन भारतीय बाजारात लिमिटेड एडिशन म्हणून सादर केलाय. यात ८३५ एसओसीचं क्वालकम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर दिलं गेलंय. मोटो झेड २ फोर्सची बॉडी अ‍ॅल्यूमिनिअमची आहे. सोबतच यात वॉटर रेप्लीएंट कोटिंगची दिली गेली आहे. फोनमध्ये ५.५ इंचाची १४४०x२५६० पिक्सल रिझोल्यूशन असलेली क्यूएचडी डिस्प्ले बॉडी आहे. 


किती जीबी रॅम?


मोटोच्या नव्या प्रिमियम फोनमध्ये ४ जीबी आणि ६ जीबी रॅमसोबत क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर दिला गेलाय. ४ जीबी रॅमसोबत ६४ जीबीचं इंटरनाल स्टोरेज मिळेल. तेच ६ जीबी रॅमसोबत १२८ जीबीचं इंटरनल स्टोरेज दिलंय. 


कॅमेरा कसा आहे?


फोनमध्ये १२-१२ मेगापिक्सलचे दोन रिअर कॅमेर देण्यात आले आहेत. हे कॅमेरे सोनीच्या IMX ३८६ इमेज सेंसरसोबत देण्यात आलेत. सेल्फीच्या शौकीन लोकांसाठी फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रन्ट कॅमेरा देण्यात आलाय. 


बॅटरी कशी आहे?


कनेक्टिव्हीटीसाठी फोनमध्ये ४जी वीओएलटीई, वाय-फाय, ब्ल्यूटूथ आहे. होम बटनमध्येही फिंगरप्रिंट सेंसरला इंटिग्रेड केलं गेलंय. फोनला पॉवर देण्यासाठी २७३० mAh बॅटरी देण्यात आलीये. ही बॅटरी १५ वॉटच्या टर्बोपावर चार्जरसोबत आहे. 


किती आहे किंमत?


मोटो झेड २ फोर्सला भारतीय बाजारात ३४ हजार ९९९ रूपयांमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. हा फोन विक्रीसाठी फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल. त्यासोबतच मोटो हबवरही मिळेल.