फोल्डेबल स्मार्टफोनची एकेकाळी प्रचंड क्रेझ होती. पण जसजसे तंत्रज्ञान विकसित होत गेले तसंतसे हे फोल्डेबल स्मार्टफोन स्पर्धेत मागे पडले आणि आऊडेटेड म्हणून पाहिले जाऊ लागले. पण आता काही कंपन्या पुन्हा एकदा हे फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात आणत आहेत. यावेळी त्यामध्ये भन्नाट तंत्रज्ञान वापरलं जात असल्याने ते मोठ्या कंपन्यासांठी स्पर्धा निर्माण करत आहेत.  चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी मोटोरोला नेहमी आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे आणि भन्नाट मोबाईल आणत असते. त्यातच आता त्यांनी एक भन्नाट स्मार्टफोन सादर केला आहे.  हा फोन तुम्ही घड्याळाप्रमाणे हातात घालू शकता. जाणून घ्या या स्मार्टफोनबद्दल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोटोरोलाने Lenovo Tech World 2023 मध्ये आपल्या नव्या स्मार्टफोनचा प्रोटोटाइप सादर केला आहे. ज्यामध्ये या बेंड फोनला प्रदर्शित करण्यात आलं. या प्रोटोटाइपवरुन स्पष्ट झालं आहे की, या नव्या स्मार्टफोनचा डिस्प्ले फ्लेक्सिबल असणार आहे. हा स्मार्टफोन इतका फ्लेक्सिबल असणार आहे की, तुम्ही त्याला वाकवून आपल्या मनगटावर घड्याळ किंवा ब्रेस्लेटप्रमाणे घालू शकता. इतकंच नाही तर तो तुम्ही सरळ उभाही करु शकता. यामुळे तुम्ही हात मोकळे ठेवूनही मोबाईलचा आनंद लुटू शकता. 



हा मोबाईल कधी लाँच केला जणार आहे, याबाबत मात्र अद्याप काही स्पष्ट करण्यात आलेलं नाही. 



2016 मध्ये सर्वात प्रथम आली होती कॉन्सेप्ट


कंपनीने 2016 मध्ये सर्वात आधी ही संकल्पना मांडली होती. त्यावेळी त्याला रिस्ट फोन म्हटलं जात होतं. पण त्यानंतर मोटोरोलाने यासंदर्भात काहीच माहिती दिली नव्हती. पण आता 7 वर्षांनी पुन्हा एकदा हा मोबाईल चर्चेत आहे. 


मिळणार हे खास फिचर्स


या मोबाईलमधील फिचर्सबद्दल बोलायचं गेल्यास, त्याच्यात HD+ pOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. 


या फोन सरळ ठेवल्यास डिस्प्ले 6.9 इंचांचा आहे. तसंच जर तो वाकवला तर 4.9 इंचांपर्यंत जातो. 


तुम्ही हा फोन इतका वाकवू शकता की घड्याळाप्रमाणे हातात घालू शकता.


कंपनीचा हा नवा कॉन्सेप्ट फोन मोटोरोलाच्या वाढत्या तंत्रज्ञानाला दर्शवत आहे. जो फोल्डेबल आणि रोलेबल अशा दोन्ही तंत्रज्ञानांसह काम करण्यास मदत करेल.