नवी दिल्ली : मोटोरोलाने (Motorola) गेल्या काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात Motorola One Action स्मार्टफोन लॉन्च केला होता. या फोनची किंमत १३ हजार ९९९ रुपये इतकी होती. भारतात मोटोरोलाचा १० हजार रुपयांच्या खाली कोणताही स्मार्टफोन नाही. अशातच कमी बजेट असणाऱ्या यूजर्ससाठी Motorola E6 Plus हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉन्चच्या आधी कंपनीकडून या फोनबाबत लीक्स जाहीर करण्यात येत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी जर्मनींमध्ये आयोजित IFA 2019 मध्ये या स्मार्टफोनला प्रदर्शित करण्यात आलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, या स्मार्टफोनमध्ये ६४ जीबी मेमरी देण्यात आला आहे.


या फोनमध्ये MediaTek Helio P22 प्रोसेसरचा वापर करण्यात येणार आहे. स्मार्टफोनला २ जीबी रॅम देण्यात आला आहे. भारतात ४ जीबी रॅम असणारा स्मार्टफोन लॉन्च होणार असल्याचं बोललं जातंय. 


Motorola E6 Plus ला १३+२ मेगापिक्सल रियर कॅमेरा सेटअप आणि ८ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा असण्याची शक्यता आहे. या फोनला ३०००mAh बॅटरी असणार आहे. या स्मार्टफोनची किंमत जवळपास ८ हजार रुपये असण्याची माहिती आहे.