मुंबई : जगातली प्रसिद्ध मोबाईल कंपनी मोटोरोलाने आपला आणखी एक नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने हा फोन मोटो झेड 3 या नावाने लॉन्च केला आहे. कंपनीचा हा फोन मोटो झेड 3 प्‍लेचा अॅडवांस प्रीमियम व्हर्जन आहे. हा फोन स्‍टॉक अँड्रॉयडसह लॉन्च झाला आहे. मोटो झेड सीरीजच्या इतर फोन प्रमाणे या फोनमध्ये देखील मोटो मॉड्सचा वापर करता येऊ शकतो. या फोनच्या 5जी मोटो मॉड्ससाठी कंपनीने लेनोवोसोबत करार केला आहे. ज्यामुऴे भविष्यात मोटो झेड 3 स्‍मार्टफोन 5जी टेक्‍नोलॉजीला देखील सपोर्ट करेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोनची किंमत अमेरिकेत 480 डॉलर म्हणजेच 33 हजार रुपये आहे. कंपनीने हा फोन सेरेमिक ब्‍लॅक रंगात लॉन्च केला आहे. फोनची विक्री 16 ऑगस्ट पासून सुरु होणार आहे. मोटो झेड 3 मॉड्सची किंमत किती असेल याबाबत अजून कोणताही खुलासा कंपनीने केलेला नाही. हा फोन लवकरच भारतात देखील लॉन्च होणार आहे. या वर्षाच्या शेवटी हा फोन भारतात लॉन्च केला जावू शकतो.


स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचं झालं तर मोटो झेड मध्ये आयफोन एक्‍स सारखं 1 बटन नेविगेशन देण्यात आलं आहे. हा फोन 8.1 अँड्रॉईड ओरियोवर चालतो. फोनमध्ये 6 इंचाची फुल-एचडी आणि एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. स्‍क्रीन रिजोल्‍यूशन 1080x2160 पिक्सल आहे. मॅक्स व्हिजन 18:9 आस्पेक्ट रेशो आणि 2.5 डी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम प्रोसेसर देण्यात आलं आहे. 12 मेगापिक्सलचा कॅमेरा तर 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची इनबिल्‍ट स्‍टोरेज 64 जीबी आहे. 2 टीबीपर्यंत मेमरी वाढवता येवू शकते. या फोनमध्ये 3000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.