मुंबई : Motorola ने भारतीय बाजारात स्वस्त आणि जबरदस्त लेटेस्ट स्मार्टफोन Moto E7 Power लॉन्च केला. Moto E7 Power हा फोन मोटोरोलाचा एकदम भारी मोबाईल आहे. आज पहिल्यांदाच हा फोन खरेदी करण्याची संधी मिळाली. दुपारी 12 वाजेपासून फोनसाठी ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर सेल सुरु झाला. Moto E7 Power हा कंपनीचा E7 सीरिजमधील तिसरा फोन आहे. यापूर्वी कंपनीने Moto E7 आणि E7 Plus आणले होते. (Motorola launches the cheapest and most powerful smartphone)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Moto E7 Power अँड्राइड 10 ओएसवर सिस्टीमवर चालणार आहे. हा मोबाईल मीडियाटेक हिलियो जी 25 प्रोसेसरवर काम करतो. यात 6.5 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले आहे. हा फोन दोन स्टोरेज पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यात माइक्रोएसडी कार्ड स्लॉट देखील आहे. त्याद्वारे 1TB पर्यंत स्टोरेज क्षमता आहे. तर, फोटोग्राफीसाठी ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात 13MP प्रायमरी सेन्सर आणि 2MP मॅक्रो लेन्स कॅमेरा आहे. 


तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5MP क्षमतेचा कॅमेरा आहे. याशिवाय पोट्रेट मोड, पॅनोरामा, फेस ब्युटी, मॅक्रो व्हिजन, मॅन्युअल मोड आणि एचडीआर मोड यांसारखे अनेक प्री-लोडेड कॅमेरा फिचर्सही आहेत. तसेच पॉवर बॅकअपसाठी यात 5,000mAh ची बॅटरीही आहे.


Moto E7 Power च्या 2GB + 32GB स्टोरेज असून या मोबाईलची किंमत 7 हजार 499 रुपये आहे. तर, 4GB + 64GB च्या फोन किंमत 8 हजार 299 रुपये आहे. रेड आणि ब्लू अशा दोन रंगात हा मोबाईल उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवर या फोनच्या खरेदीसाठी नो-कोस्ट ईएमआयचा पर्याय देण्यात आला आहे.