मुंबई : Motorola लवकरच एक नवीन तगडा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. Moto G32 हा नवा स्मार्टफोन बाजारात येत असल्याने याची मोठी उत्सुकता आहे. मुकुल शर्माने याआधीच एक व्हिडिओ शेअर करत डिव्हाइसचे डिझाइन तसेच त्याची प्रमुख वैशिष्ट्ये उघड केली आहेत. Moto G32 ची किंमत खूप कमी असणार आहे. या स्मार्टफोन फोनमध्ये 50MP कॅमेरा असणार आहे. हा फोन जबरदस्त आहे. या Moto G32 चे डिझाईन आणि फीचर्स जाणून घ्या.


Moto G32 Color Options


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधी मिळालेल्या माहितीनुसार Moto G32 हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च होत आहे. यात Unisoc चिपसेट असेल. मुकुल शर्मा यांने स्पष्ट केलेय की, हा फोन स्नॅपड्रॅगन 680 चिपसेटद्वारे चालणार आहे, जे Moto G32 च्या युरोपियन आवृत्तीमध्ये देखील आहे. व्हिडिओवरून पाहिले जाऊ शकते, Moto G32 काळ्या रंगाच्या पर्यायात उपलब्ध आहे. 


Moto G32 Design


या फोनमध्ये लाल कलरवे देखील मिळेल. डिव्हाइसच्या डिस्प्लेमध्ये नॅरो बेझलमध्ये आहे. त्याचा फ्रंट कॅमेरा डिस्प्लेच्या मध्यभागी पंच होलमध्ये ठेवला आहे. उजवीकडे पॉवर बटण आणि व्हॉल्यूम रॉकर आहे. यात 3.5 मिमी हेडफोन जॅक, स्पीकर ग्रिल, सिम कार्ड ट्रे आणि चार्जिंगसाठी यूएसबी टाइप सी पोर्ट देखील आहे.


Moto G32 Specifications


Moto G32 मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले पॅनेल आहे. डिव्हाइस स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट द्वारे आधारित आहे ज्यामध्ये 4GB RAM आणि 128GB स्टोरेज क्षमता आहे (मायक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येते).


Moto G32 कॅमेरा


या मोबाईलमध्ये जबरदस्त कॅमेरा आहे. ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 50MP प्राथमिक सेन्सर, 8MP अल्ट्रावाइड लेन्स आणि 2MP मॅक्रो युनिट आहे. तसेच फ्रंटसाठी G32 मध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 16MP कॅमेरा आहे.