नव्या वर्षात मुकेश अंबांनी सुरू करू शकतात हा नवा बिजनेझ
रिलायंस जिओच्या लॉन्चिंगनंतर २०१७ हे सालं मुकेश अंबांनीसाठी फारच उत्तम ठरलं आहे.
मुंबई : रिलायंस जिओच्या लॉन्चिंगनंतर २०१७ हे सालं मुकेश अंबांनीसाठी फारच उत्तम ठरलं आहे.
भारतातील अब्जाधीशांमधील अव्वल स्थानही मुकेश अंबांनींनी टिकवले आहे. २जी, ३जी नंतर अंबांनी त्यांच्या ग्राहकांना थेट स्वस्तात ४ जी सेवा दिली आहे. मुकेश अंबांनींनी टेलिकॉम इंड्स्ट्रीमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता नव्या वर्षात नवी सेवा ग्राहकांसाठी उपलब्ध करण्याची तयारी मुकेश अंबांनी करत आहेत.
नुकतीच रिलायन्स इंडस्ट्रीने ४० वर्ष पूर्ण केली आहे. मीडियामध्येही अंबानींच्या भविष्यातील प्रोजेक्ट बाबत अंदाज वर्तवले जात आहेत. काही रीपोर्ट्सनुसार, नव्या वर्षात रिलायंस इंडस्ट्री ओला, उबरप्रमाणे टॅक्सी एग्रीग्रेटर सर्व्हिस लॉन्च करण्याची शक्यता आहे. सोबतच स्टार्टअपकडेही त्यांचा ओढा आहे. नव्या वर्षात कंपनी स्वतःची पेमेंट बॅंकदेखील सुरू करू शकते.
जिओ पेमेंट बॅंक
ऑक्टोबर २०१७ साली जिओ पेमेंट बॅंक लॉन्च करण्याचे प्लॅन होते. मात्र काही कारणास्तव जिओ पेमेंट बॅंक हा प्रोजेक्ट २०१८ मध्ये ग्राहकांसमोर येऊ शकतो. मोदी सरकारच्या कॅशलेस योजनेला चालना देण्यासाठी एसबीआय सोबत जिओ पेमेंट बॅंक काम करण्याची शक्यता आहे.
कॅब सर्व्हिस
काही मीडिया रिपोर्टनुसआर, नव्या वर्षामध्ये ओला, उबर प्रमाणेच जिओ स्वतःची नवी टॅक्सी सर्व्हिस सुरू करण्याची शक्यता आहे.
क्लीन एनर्जी
रिन्युएबल एनर्जीला चालना देण्यासाठी हा प्रोजेक्ट अंबांनींकडून सुरू होण्याची शक्यता आहे.