Mysterious Antarctica: 'अंटार्टिका येथे एक गुप्त दरवाजा आहे?' असा प्रश्न सध्या रेडीटवर विचारला आहे. सोशल मीडियावर एका फोटोचा स्क्रीनशॉट शेअर करुन हा प्रश्न विचारण्यात आला आहे. गुगल मॅपवरील एक फोटो शेअर करत हा प्रश्न विचारला जात आहे. गुगल मॅपवर दिसणाऱ्या या फोटोमध्ये बर्फ आणि डोंगरकडांमध्ये एक चौकोनी गोष्ट दिसत आहेत. हा चौकोनी भाग म्हणजे गुप्त दरवाजा आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या चौकोनी गोष्टीसंदर्भात वेगवेगळे दावे केले जात आहेत. ही गोष्ट नेमकी काय असावी यासंदर्भात सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु असताना यामागील सत्याही समोर आलं आहे.


UFO चा तुटलेला भाग की गुप्त दरवाजा?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकांनी गुगल मॅपवर बर्फात दिसणारी ही चौकोनी गोष्ट म्हणजे एक दरवाजा असून त्यामागे एक गुप्त बंकर असल्याचा दावा केला आहे. मात्र काहींनी आपली कल्पनाशक्ती वापरत हा एखाद्या उडत्या तबकडीचा तुटलेला भाग असावा, असाही अंदाज व्यक्त केला आहे. काहींनी तर हा चौकोनी तुकडा म्हणजे एखाद्या विमानाचा तुटलेला दरवाजा असेल, असंही म्हटलं आहे. 


नक्की कुठला आहे हा फोटो?


रेडिट युझरने दिलेल्या माहितीनुसार गुगल मॅपवर “69°00'50"S 39°36'22"E” या कॉर्डिनेट्सवर ही गोष्ट दिसून येत असा दावा स्क्रीनशॉट शेअर करत केला आहे. या स्क्रीनशॉटमध्ये अंटार्टिकाचा एरिएल व्ह्यू दिसतोय. फोटोत बराचश्या भागावर बर्फ असून काही डोंगरकडांवरील खडकही दिसत आहेत. मात्र बर्फाच्या मध्येच एक चौकोनी आकाराच्या वस्तूसारखं काहीतरी दिसत आहे. या गोष्टीनेच सर्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा गोष्ट नेमकी काय असेल याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता असून त्यामुळेच हा स्क्रीनशॉट व्हायरल झालाय.


नक्की वाचा >> ...म्हणून इथं चौथ्या मजल्यावर किंवा घरात पार्क केल्यात 2 Wheelers; फोटो झाले व्हायरल


तुम्हीच पाहा हा स्क्रीनशॉट आणि पोस्ट...



हा चौकोनी भाग नेमकं आहे तरी काय?


रेडिटवर अनेकांनी अनेक वेगवेगळे तर्क लावले असले तरी यामागील सत्य काहीतरी वेघलं आहे. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, बर्फात दिसणारी ही चौकोनी गोष्ट म्हणजे एक हिमनग आहे. 'न्यूकॅसेल विद्यापीठा'मधील ग्लॅसिओलॉजीचे प्राध्यापक बेथन डेव्हीस यांनी, "हा एक हिमनग असून तो जमीनीवर अडकून पडला आहे. आता तो आहे त्याच ठिकाणी वितळत चाललाय," अशी माहिती दिली. "याच भागात असे अनेक अडकलेले हिमनगर दिसून येतील," असंही डेव्हीस म्हणाले. गुगल मॅपवर अशाप्रकारच्या अनेक गोष्टी रहस्यमय वाटतील अशा दिसतात मात्र सत्यात त्या अगदी साध्यासुध्या गोष्टी असतात असंही अनेकांनी म्हटलं आहे.