मुंबई : Yerha.com ने इलारी नॅनोफोन सी भारतात लाँच केला आहे. हा जगातील सर्वात छोटा स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. हा जीएसएम फोन क्रेडिट कार्डच्या आकाराचा आहे. ज्याची किंमत भारतात 3 हजार 940 रुपये ठेवण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोनचं वजन ३० ग्रॅम आहे. हा फोन स्टायलिश, छोटासा आणि अँटी-मोबाईल स्मार्टफोन आहे. भारतात हा फोन ब्लॅक, रोज गोल्ड आणि सिल्वर कलरमध्ये उपलब्ध आहे. 


‘इलारी नॅनोफोन सी’मध्ये पुढील प्रकारची फीचर्स आहेत. 


१ इंच आकाराची स्क्रीन,मीडियाटेक MT6261D चिपसेट प्रोसेसर, 32 MB रॅम, 32 GB इंटर्नल स्टोरेज, ड्युअल सिम स्लॉट, 280mAh क्षमतेची बॅटरी, MP3 प्लेयर, FM रेडियो, फोन रेकॉर्डिंग