मुंबई : व्हॉटस अॅपचा प्रमुख बनवण्याची संधी एका भारतीय मुलाला मिळणार आहे, नीरज अरोडा  WhatsApp चे नवे सीईओ होवू शकतात. WhatsApp च्या सीईओचं पद जेन कूम यांनी राजीनामा दिल्यानंतर खाली झालं आहे. रिपोर्टसनुसार या पदासाठी नीरज अरोडा यांच्या नावाचा विचार सुरू आहे, नीरज अरोडा यापूर्वी गुगलला होते. जर नीरज व्हॉटस अॅपचा प्रमुख झाला तर हे मोठं यश असेल. संध्याच्या स्थिती जगातील टॉप मोस्ट टेक्नॉलॉजी कंपनीच्या पोस्टवर भारतीय आहेत. गुगलचे चीफ सुंदर पिचई हे भारतीय आहेत. तर मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नडेला आहेत. या शिवाय एडोबीचे शांतनु नारायण देखील टॉप पोस्टवर आहेत.


नीरज २०११ पासून व्हॉटस अॅप सोबत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टेक क्रंचने दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलंय की, सीईओ पदासाठी WhatsApp चे बिझनेस एक्झिक्युटीव्ह नीरज अरोडा एक उमेदवार असू शकतात. अरोडा यांनी गुगलमध्ये देखील कॉरपोरेट डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून काम पाहिलं आहे. नीरज २०११ पासून व्हॉटस अॅप सोबत आहेत, अरोडा हे आयआयटी दिल्ली आणि इंडियन स्कूल ऑफ बिझनेसचे माजी विद्यार्थी आहेत. जर अरोडा हे मॅसेजिंग अॅप व्हॉटस अॅपचे सीईओ झाले, तर ते त्या भारतीयांच्या लिस्टमध्ये सामिल होतील, जे जगातील टेक्नॉलीचं सर्वोच्च पद भूषवित आहेत.


आयआयटी दिल्लीहून शिक्षण


आयआयटीहून ग्रॅज्यूएट झाल्यानंतर अरोडाने आपल्या करिअरची सुरूवात २००० साली एका क्लाऊड सोल्यूशन कंपनी Accellion सोबत केली. ते कंपनीचे सुरूवातीचे इंजीनिअर होते, ज्यांनी कोअर टेक्नॉलॉजीवर पीस तयार केले. अरोडाने २००६ मध्ये इंडियन स्कूल ऑफ बिझनेस (ISB) हून फायनान्स अॅण़्ड स्ट्रॅटर्जीसाठी एमबीए केलं, यानंतर अरोडाने टाईम्स इंटरनेट लिमिटेडमध्ये १८ महिेने काम केलं. अरोडा २००७ साली गुगलसोबत होते, त्यांनतर मागील ७ वर्षापासून ते व्हॉटसअॅपसोबत आहेत.