जाणून घ्या कसं मिळवाल OTT प्लॅटफॉर्मचं मोफत सबस्क्रिप्शन
नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, डिस्ने + हॉटस्टार साऱख्या OTT प्लॅटफॉर्मचं फ्री सब्सक्रिप्शन,ही कंपनी देतेय ऑफऱ
मुंबई : देशात सिनेमासोबत ओटीटी प्लॅटफॉर्मवर कटेंट पाहणाऱ्यांची संख्या खुप जास्त आहे. मात्र या ओटीटी प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शन घेण खुपच महागातलं असल्याने अनेकांची गैरसोय होते. अशाच नागरीकांसाठी आता मोफत सबस्क्रिप्शन मिळणार आहे. हे सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी युझर्सना फक्त एक फ़ॉर्म भऱायचा आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
OTT सबस्क्रिप्शन मोफत मिळवण्यासाठी तुम्हाला कोणता फॉर्म भरावा लागेल असा प्रश्न तुम्हाला पडत असेल. तर नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि डिस्ने + हॉटस्टार या तिन्हींचा मोफत प्रवेश दूरसंचार कंपनी जिओच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये उपलब्ध आहे. तुम्हाला या OTT सबस्क्रिप्शनचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला Jio च्या पोस्टपेड प्लानसाठी अर्ज करावा लागेल आणि त्याचा फॉर्म भरावा लागेल.
सर्वात स्वस्त प्लॅन
जिओच्या या पोस्टपेड प्लॅनची किंमत 399 रुपये आहे आणि यामध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्यासाठी 75GB इंटरनेट, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस दिले जात आहेत. ही योजना Netflix, Amazon Prime Video आणि Disney+Hotstar वर एका वर्षाच्या मोफत प्रवेशासह येते.
दुसरा स्वस्त प्लॅन
599 रुपयांचा हा प्लॅन तुम्हाला 100GB इंटरनेट, दररोज 100 SMS आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंग ऑफर करतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला Netflix, Amazon Prime Video आणि Disney + Hotstar चे एक वर्षाचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे.
पोस्टपेड प्लॅन
799 रुपयांच्या प्लॅनमध्ये 150GB डेटा आणि 200GB रोलओव्हर डेटा दिला जात आहे. या फॅमिली प्लॅनमध्ये तुम्हाला दोन अतिरिक्त सिम कार्ड, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि अमर्यादित एसएमएसची सुविधा दिली जात आहे. Netflix, Amazon Prime Video आणि Disney + Hotstar चे सदस्यत्व देखील या योजनेचा एक भाग आहे.
सर्वात महाग प्लॅन
एक हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या OTT प्लॅनच्या यादीतील हा सर्वात महागडा प्लान आहे. 999 रुपयांमध्ये उपलब्ध असलेल्या या पोस्टपेड प्लॅनमध्ये 200GB हायस्पीड डेटा, 500GB रोलओव्हर डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएस सुविधा आणि तीन सिम कार्ड दिले जात आहेत. या योजना नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि डिस्ने + हॉटस्टारच्या सदस्यत्वासह देखील येतात.
वरील प्लॅन घेऊन तुम्हाला या प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला हवा असलेला प्लॅन खरेदी करता येणार आहे.