Netflix Partnership With Microsoft: चित्रपट, माहितीपट, वेब सीरिज पाहण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मला सर्वाधिक पंसती दिली जाते. अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म सध्या उपलब्ध आहेत. त्यामुळे ओटीटीमधील स्पर्धा तीव्र झाली आहे. नेटफ्लिक्स भारतात 2016 पासून सेवा देत आहे.  मात्र असं असलं तरी नेटफ्लिक्सचे दर चढेच असल्याने ग्राहकांनी या ओटीटीकडे पाठ फिरवली होती. आता नेटफ्लिक्स स्वस्त प्लान लाँच करण्याच्या तयारीत आहे. यासाठी नेटफ्लिक्सने मायक्रोसॉफ्टसोबत पार्टनरशिप केली आहे. मायक्रोसॉफ्ट आता नेटफ्लिक्सच्या ग्लोबर अॅडव्हरटायजिंग टेक्नोलॉजी आणि सेल्स पार्टनर बनला आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नडेला यांनी ही माहिती ट्वीट करून दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"नेटफ्लिक्सने मायक्रोसॉफ्टची जाहिरात तंत्रज्ञान आणि विक्री भागीदार म्हणून निवड केल्याने आम्हाला आनंद झाला आहे. पब्लिशर्सकडे अधिक दीर्घकालीन व्यवहार्य जाहिरात कमाई प्लॅटफॉर्म असावेत अशी आमची इच्छा आहे, जेणेकरुन अधिक लोक आवडत असलेला कंटेट पाहू शकतील.", असं ट्वीट मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नडेला यांनी केलं आहे.



नेटफ्लिक्सच्या महागड्या योजनांमुळे कंपनीला सतत तोटा सहन करावा लागत आहे. तोटा भरून काढण्यासाठी कंपनीने काही महिन्यांपूर्वी गेमिंग सेवा सुरू केली आहे. गेमसाठी ग्राहकांकडून वेगळे शुल्क आकारले जाणार नाही. गेमिंग सेवा फक्त नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध असेल. नेटफ्लिक्सने म्हटले आहे की, गेमिंग दरम्यान कोणत्याही वापरकर्त्याला कोणतीही जाहिरात दाखवली जाणार नाही.