Netflix Rolling Out New Feature: आपल्या फ्रेण्ड सर्कलमध्ये एखादा तरी मित्र असा असतो की ज्याकडे एकाही ओटीटी प्लॅटफॉर्मचं (OTT Platform Subscription) सबक्रिप्शन नसतं. मात्र अशा व्यक्तीची ओळख किंवा मित्रांच्या भाषेत सांगायचं झाल्यास 'सेटिंग' एवढ्या जागी असते की दुसऱ्यांचे पासवर्ड घेऊन तो सर्व काही चालवू शकतो. बरं हे असं अनेक फ्लॅटफॉर्मबाबत होतं. अगदी मेड इन इंडिया ओटीटी प्लॅटफॉर्मपासून ते आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मपर्यंत हाच ट्रेण्ड दिसून येतो. 'नेटफ्लिक्स' (Netflix) हे अशाच काही लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मपैकी एक आहे जे शेअरिंगच्या माध्यमातून वापरलं जातं. मात्र आता 'नेटफ्लिक्स'ने अशी शेअरिंग (Netflix Subscription Plan) करण्याची सवय असणाऱ्यांना दणका देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भातील हलचाली कंपनीने सुरु केल्या आहेत.


जास्त किंमत आकारली जाणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'नेटफ्लिक्स'ने सन 2023 च्या पहिल्या तिमाहीच्या शेवटापर्यंत पासवर्ड-शेअरिंगसंदर्भातील (Password Sharing) नियम अधिक व्यापक करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील कंपनीची सगळी तयारी पूर्ण झाली आहे. याशिवाय जी व्यक्ती 'नेटफ्लिक्स'चा पासवर्ड शेअर करुन आपल्या घरातील इतर व्यक्तींना तो पासवर्ड देत असेल तर त्यासाठी अतिरिक्त रक्कम आकारली जाणार आहे.


'नेटफ्लिक्स' म्हणतं आम्हाला फायदा होईल


'नेटफ्लिक्स'ने जारी केलेल्या आपल्या पत्रकामध्ये, "आम्ही 2023 च्या पहिल्या तिमाहीच्या शेवटी व्यापक स्वरुपामध्ये पेमेंट शेअरींगचा पर्याय सुरु करण्याचा विचार करत आहोत. यासंदर्भातील काम सुरु असून त्याचा निकाल 2023 मध्ये फार वेगळ्याच तिमाही पेड नेट अॅड पॅटर्नच्या माध्यमातून समोर येईल. याचा आम्हाला फायदा होईल," असं म्हटलं आहे.


पासवर्ड शेअर केला तर..


'नेटफ्लिक्स' कंपनीने केलेला हा बदल त्या लोकांसाठी असेल जे आपल्या खात्याचा पासवर्ड (Password) इतरांबरोबर शेअर करतात. 'आम्ही नेटफ्लिक्स वापरण्याचा अनुभव अधिक छान आणि उत्तम करण्यासाठी फार प्रयत्न करत आहोत. आम्ही पेड शेअरिंग सुरु करत आहोत. जर एकच यूझर एखाद्या व्यक्तीबरोबर पासवर्ड शेअर करत असेल तर त्यांना अतिरिक्त रक्कम मोजावी लागेल. त्यामुळे सर्वच सदस्य टीव्ही किंवा मोबाईलवर कंटेटचा उपभोग घेऊ शकतील,' असं कंपनीने म्हटलं आहे.


भारतात लागू होण्याची शक्यता


हे सध्या कोणकोणत्या देशांमध्ये लागू होणार आहे याबद्दल कंपनीने कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. मात्र हे फिचर भारतामध्ये लागू होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे यापुढे 'नेटफ्लिक्स'चा पासवर्ड मित्रांबरोबर शेअर करणं महागात पडणार आहे हे मात्र नक्की.