मुंबई : तुम्ही जर नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी मोठी बातमी आहे. कारण आता १ जूनपासून कार खरेदी करणाऱ्यांच्याही अडचणी वाढणार आहेत. त्यामुळे कार खरेदीदारांसाठी ही महत्वाची बातमी आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात महागाई वाढली असताना सरकार एकीकडे काही वस्तुंवरील दर कमी करण्याचा विचार करतेय तर काही वस्तुंवरचा कर वाढवला आहे. त्यानुसार 1 जूनपासून  नवीन कार  खरेदी महागणार आहे.


विमा महागणार 
१ जूनपासून थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियम महाग होणार आहे. ही महागाई 1500 CC पर्यंतच्या कारसाठी असू शकते. तर 
नवीन वैयक्तिक कारसाठी आता थर्ड पार्टी प्रीमियम 23% अधिक (1000 सीसी पर्यंत) (3 एकरकमी 3 वर्षे) भरावा लागेल. याशिवाय, 1100 CC ते 1500 CC पर्यंतच्या कारसाठी थर्ड पार्टी प्रीमियम 11% अधिक भरावा लागेल.


बाईकचा विमाही महागणार   
नवीन दुचाकी खरेदी करणाऱ्यांवरही या महागाईचा परिणाम होणार आहे.  बाईक खरेदी करणाऱ्यांचा थर्ड पार्टी प्रीमियम आता 17% जास्त असेल.त्यामुळे नवीन वाहन खरेदीदार मग तो चारचाकी असो वा दुचाकी त्यांना मोठा फटका बसणार आहे.