नवी दिल्ली : मारूती सुझुकीची नवीन स्विफ्ट हॅचबॅकने ६० हजार बुकिंगचा आकडा पार केलाय. नवीन स्विफ्टने फार कमी वेळात हा आकडा पार केलाय. 


स्विफ्टची डिमांड वाढली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवीन स्विफ्ट कार ऑटो एक्सपो-२०१८ मध्ये लॉन्च केली गेली होती. लॉन्च झाल्यानंतर साधारण दोन महिन्यांचा कालावधी होता, पण आता चार महिन्यांचा वेटिंग पिरीयड मिळत आहे. दिल्लीच्या मारूती डिलर्सचं म्हणनं आहे की, वीएक्सआय व्हेरिएंटची सर्वात जास्त मागणी आहे. डिमांड जास्त असल्याने डिलिव्हरी उशिराने मिळणार आहे. त्यामुळे वेटिंग पिरीयड वाढवण्यात आलाय. 


कधी झाली होती लॉन्च


नवीन मारूती स्विफ्ट ८ फेब्रुवारीला लॉन्च झाली होती लॉन्चआधी साधारण ३० हजार बुकिंग मिळाली होती. बाकी बुकिंग लॉन्चिंगनंतर मिळाली आहे. ह्युंदाई ग्रॅंड आय१० सोबत या कारची तुलनेत या कारची विक्री अधिक होत आहे. 


किती रूपयात बुकिंग?


नवीन मारूती सुझुकी स्विफ्टच्या बुकिंगसाठी तुम्हाला ४० हजार रूपये द्यावे लागतील. प्री-बुकिंग जानेवारी २०१८ मध्ये सुरू झाली आहे. मारूतीने स्पष्ट केलंय की, मारूती सुझुकी स्विफ्टचा वेटिंग पिरीय्ड १६ आठवड्यांचा आहे. 


या कारची बुकिंग घटली...


मारूती स्विफ्टच्या येण्याने ह्युंदाईच्या ग्रॅंड आय१० ची विक्री कमी झाली आहे. जानेवारी २०१८ मध्ये ग्रॅंड आय१० चे १२ हजार १०९ यूनिट आणि डिसेंबर २०१७ मध्ये १२ हजार ९५५ यूनिट विकले गेले होते. नवीन स्विफ्ट आल्याने ह्युंदाई ग्रॅंड आय१० च्या विक्रीत ८०० यूनिटने घट झाली आहे. 


मॉडिफाय करू शकता नवीन स्विफ्ट


डिझाई आणि फीचरच्या बाबतीत नवीन स्विफ्ट जबरदस्त आहे. एका स्विफ्टला दुस-या स्विफ्टपेक्षा वेगळी करण्यासाठी आय-क्रिएट किटचा पर्याय ठेवण्यात आलाय. यामुळे तुम्ही कार स्वत: मॉडिफाय करू शकता.