मुंबई : रिलायंस जिओ बाजरात आल्यानंतर टेलिकॉम क्षेत्रातील चुरस अधिकच वाढली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक टेलिकॉम कंपन्यांनी या क्षेत्रातील आपलं अस्तित्त्व आणि ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी नवनव्या ऑफर्स आणल्या आहेत. 


सुरूवातीला जिओने 'हॅपी न्यू इयर' प्लॅन अंतर्गत ग्राहकांना प्रतिदिन 1 जीबी डाटा प्लॅन आणला होता. आता या जिओ ग्राह्कांना दोन अजून ऑफरचा लाभ घेता येणार आहे. 


काय आहे नवा प्लान ? 


प्रतिदिन १ जीबी डाटा या प्लॅनची किंमत  आता ६० रूपयांवरून ५०  रूपये  करण्यात आली आहे.  २८जीबी डाटा चा प्लान १९९ ऐवजी आता १४९ रूपयात मिळणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी आता२८ दिवसांची आहे. ७०जीबी डाटा प्लॅनदेखील आता ३९९ ऐवजी ३४९ रूपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी ७० दिवसांची आहे. 



 


५० % अधिक फायदा 


जिओ आता ग्राहकांना ५० % अधिक डाटा उपलब्ध करून देणार आहे. यामध्ये तुमच्या प्रत्येक दिवसाच्या डेटा प्लानची लिमिट वाढवण्यात आली आहे. 



प्रतिदिन १.५ जीबी डाटा  


५० % अधिक फायदा या प्लॅनमुळे ग्राहकांना पूर्वी १ जीबी डाटा मिळत होता.आता नव्या प्लॅननुसार ग्रहकांना १.५ जीबी डाटा मिळणार आहे. रिलायन्स जिओच्या नव्या प्लॅनचा फायदा ग्राहकांना ९ जानेवारीपासून घेता येणार आहे.