मुंबई : Nissan Electric Car News : निसानने नवीन कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक वाहनाची घोषणा केली आहे. निसान मायक्राच्या यशानंतर ही कार आणली जात आहे. जी यापूर्वी भारतातही विकली गेली होती. आता ही कार इलेक्ट्रिक प्रकारात आणली जात आहे. युरोपियन बाजारपेठेत विकली जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इलेक्ट्रिक वाहनांचा ट्रेंड भारतातही आला आहे, त्यामुळे निसान भारतातही लॉन्च करेल यात आश्चर्य वाटणार नाही. ही कार फ्रान्समधील निसान कारखान्यात बनवली जाणार असून ती अत्यंत किफायतशीर असणार आहे. किफायतशीर असल्याने, भारतातही येऊ शकते. कंपनीने आतापर्यंत ही छोटी कार केवळ युरोपमध्ये विकण्याची बोलणी केली आहे.


कंपनीचा 2030चा रोडमॅप 


या जपानी ब्रँडने सांगितले की, हे नवीन इलेक्ट्रिक वाहन निसानच्या एम्बिशन 2030 व्हिजनचा एक भाग आहे. उर्वरित ईव्हीमध्ये निसान एरिया, नवीन इलेक्ट्रिक क्रॉसओवर, नवीन कश्काई आणि एक्स-ट्रेल यांचा समावेश आहे. ही कॉम्पॅक्ट ईव्ही निसानने डिझाईन केली आहे आणि रेनॉल्टद्वारे तिचे उत्पादन केले जाईल. जे ही इलेक्ट्रिक कार CMF C-EV प्लॅटफॉर्मवर तयार करेल. या प्लॅटफॉर्मसह, दोन्ही कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांना वेगळा आणि अनोखा लूक देता येणार आहे. कंपनीने 2030 च्या रोडमॅपमध्ये अनेक अलायन्स देखील केली आहे.


टीझरमध्ये कारचे गोल हेडलॅम्प  


निसानचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर अश्वनी गुप्ता म्हणाले, "हे सर्व-नवीन मॉडेल निसानने डिझाइन केले आहे आणि निसानने नवीन कॉमन, किंवा एकत्रित प्लॅटफॉर्म वापरुन, या कराराचा जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्यासाठी इंजिनियरिंग आणि निर्मिती केली जाईल. निसान-नेस राखला जाईल. हे युतीच्या स्मार्ट भिन्नता दृष्टिकोनाचे एक भक्कम उदाहरण आहे." नवीन टीझर कारचे गोल हेडलॅम्प आणि त्याभोवती असलेले एलईडी डीआरएल दाखवली गेली आहे.