मुंबई :  निस्सान मोटर इंडियाने मंगळवारी नवी कार लॉन्च केली आहे. ही कार डिझेलवर असणार आहे. हॅचबॅक रेडी-गो, असे या कारचे नाव आहे. त्याची किंमत ३.६९ लाख रुपये (एक्स-शोरूम)आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निस्सान आणि डॅटसन डीलरशिपवर देशभरात ही कार उपलब्ध करुन देणार आहे, अशी माहिती निस्सान मोटर इंडियाने प्रसिद्धीला दिलेल्या एका निवेदनात स्पष्ट केलेय.


ही कार एकदम आकर्षक असून त्यात नवनवीन सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. स्टायलिश कार म्हणून ही बाजारात आणली जात आहे. खास मध्यमवर्गीयांना डोळ्यासमोर ठेवून ही कार बाजारात आणली गेली आहे. त्यामुळे या कारच्या खरेदीसाठी उड्या पडतील, अशी शक्यता आहे.