मुंबई: एटीएममधून पैसे काढण्यासाठी आता डेबिटकार्डची गरज भासणार नाही. डेबिटकार्ड नसतानाही तुम्ही बॅंक खात्यामधून पैसे काढू शकणार आहेत. पैसे काढण्यासाठी तुमच्या स्मार्टफोनचा कॅमेरा मदतगार ठरणार आहे. एटीएममधून पैसे काढण्यासाठी युनिफाईड पेमेंट इंटरफेस (UPI) अॅनेबल्ड अॅपचा उपयोग केला जाणार आहे. नवीन तंत्रज्ञान लोकांना पैसे काढण्यास मदत करणार आहे.


अॅप डाऊनलोड करण्याची गरज नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एटीएममधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला एटीएम मशीनवरील क्युआरकोड स्कॅन करावा लागणार आहे. टाईम्‍स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, बॅंकेला एटीएमची  सेवा उपलब्ध करुन देणारी एजीएस (AGS) कंपनी आहे. क्युआरकोड यूपीआय अॅनेबल्ड अॅपने स्कॅन करता येणार आहे. आपण जसे खरेदी केल्यावर पेमेंट करतो, त्याचप्रकारे एटीएममधील क्यूआर कोड स्कॅन केल्यावर तुम्हाला कॅश मिळणार आहे.   


 


एनपीसीआय ची परवानगी आवश्यक


 


ही सेवा सुरु करण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ची मंजुरी मिळणे गरजेचे आहे. एनपीसीआय ही एटीएम नेटवर्कला नियंत्रण करण्यासाठी जबाबदार आहे. एजीएस (AGS) टेक्नोलॅाजीचे सीएमडी रवी बी गोयल यांनी सांगितले, ज्या बॅंकेसोबत नवीन तंत्रज्ञानाच्या विषयात चर्चा केली आहे, त्या खूप उत्साहित आहेत. तसेच ते म्हणाले यूपीआय आणि एटीएम नेटवर्क एकाच आर्थिक स्विचवर काम करतात. यूपीआय एक अधिक सुरक्षित व्यवहार मंच आहे.


 


बँकांना अधिक पैसे द्यावे लागणार नाहीत


 


रिपोर्टमध्ये एजीएस टेक्‍नोलॉजीच्या ग्रुपचे चीफ महेश पटेलने सांगितले की, यासाठी बॅंकेला त्याच्या हार्डवेअरमधील काहीच बदल करण्याची गरज लागणार नाही. पण बॅंकेला सॅाफ्टवेअरमधील बदल करण्याची आवश्यकता आहे.  काही बँकेत कार्डलेस एटीएम विड्रोल सुविधा प्रदान करतात. परंतु ही सेवा त्यापेक्षा अधिक सोपी आणि जलद ठरणार आहे.