नवी दिल्ली :  गेल्या अनेक काळापासून स्मार्टफोनच्या बिझनेसपासून दूर राहिलेली फिनलँडची कंपनी नोकियाने नोकिया ३, नोकिया ५ , नोकिया ६ आणि नुकताच नोकिया ८ बाजारात उतरविला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर नोकिया एक नवा बजेट फोन बाजारात आणणार आहे. त्याचे स्पेसिफिकेशन लीक झाले आहे. भारतात नोकिया ३१ ऑक्टोबरला हा स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. 


बेंचमार्किंग वेबसाइट AnTuTu एक लिस्ट दिसली आहे. त्यात नोकियाच्या एका स्वस्त स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन लिस्ट करण्यात आले आहे. सांगितले जात आहे की या फोनचे नावर नोकिया २ असणार आहे. लिस्ट नुसार TA-1035 नावाच्या या स्मार्टफोनमध्ये क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन २१२ चिपसेट असणार आहे 


गेल्या काही दिवसांपासून नोकिया २ या बजेट फोनची चर्चा होती. नोकिया ३चा हल्के स्पेसिफिकेशनचे व्हर्जन असणार आहे. 


नोकियाने ९४९९ रुपयांत नोकिया ३ भारतात लॉन्च केला होता. त्यामुळे नोकिया २ हा नोकिया ३ पेक्षा खूप स्वस्त असणार आहे.. 


यात १ जीबी रॅम आणि ८ जीबी इंटरनल मेमरी असणार आहे. या फोनमध्ये ८ मेगापिक्सल बॅक कॅमेरा आणि ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा असणार आहे. याचा डिस्प्ले ४.७ ते ५ इंचादरम्यान असणार आहे. यात ४००० mAh ची बॅटरी असणार आहे. 


यापूर्वी गेल्या आठवड्यात नोकिया २ ब्ल्यूटूथ SIG साइटवर दिसला होता. त्यास स्पष्ट करण्यात आले होते की हा फोन अँड्रॉइड ७.१ नूगावर रन करण्यात येणार आहे.. याला ओरियो अपडेट असणार आहे. पण याची पुष्टी झाली नाही.