मुंबई : नोकियाच्या बहुप्रतिक्षीत नोकिया ५ या बजेट फोनची विक्री १५ ऑगस्टपासून रिटेल स्टोरमध्ये सुरू आहे. एक महिन्यांपासून या स्मार्टफोनची प्री-बुकींग सुरू होती. आता हा फोन रिटेल स्टोर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. नोकिया ५ भारतातील निवडक दहा शहरांमध्ये मंगळवारपासून विक्रीसाठी उपलब्ध असेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शहरांमध्ये मुंबई, पुणे, बंगळुरु, दिल्ली एनसीआर, चेन्नई, चंदीगड, जयपूर, कोलकता, लखनौ, इंदूर, हैदराबाद, अहमदाबाद और कालीकत या शहरांचा समावेश आहे. नोकिया 6 हा स्मार्टफोन अमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. नोकिया ५ हा फोन गेल्या महिन्यात १२ हजार ८९९ रुपयात लाँच करण्यात आला होता. यासोबतच नोकिया ६ आणि नोकिया ३ हे फोनही लाँच करण्यात आले होते.


नोकिया ५ १२ हजार ८९९ रुपयांमध्ये उपलब्ध असेल. हा फोन खरेदी करताना व्होडाफोन ग्राहकांना १४९ रुपयांमध्ये ५ GB डेटा मिळेल. तीन महिन्यांसाठी ही ऑफर सुरु राहिल. ग्राहकांना २५०० रुपयांचं makemytrip.com चं कूपन मिळेल. यामध्ये हॉटेल बुकिंगवर १८०० रुपयांची आणि विमान तिकिटावर ७०० रुपयांपर्यंत सूट मिळेल.


नोकिया ५ स्मार्टफोनचे फीचर्स :


५.२ इंच आकाराची स्क्रीन
फिंगरप्रिंट सेन्सर 
होम बटन
१३ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
3000mAh क्षमतेची बॅटरी
ऑक्टा कोअर प्रोसेसर
२GB रॅम
१६ GB इंटर्नल स्टोरेज