मुंबई : Nokia 5G Smartphone : नोकिया  (Nokia) ऑगस्टमध्ये मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. नोकिया XR20, C30, C20 Plus, G10 आणि C01 Plus या नवीन फोनची घोषणा केली. नोकिया सी 20 प्लस  (Nokia C20 Plus) तात्काळ विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. तर अन्य मॉडेल्स सध्या विक्रीसाठी उपलब्ध नाहीत. कंपनीने आता अधिकृतपणे घोषणा केली आहे की 20 ऑक्टोबर रोजी रग्ड नोकिया एक्सआर 20 (Nokia XR20) भारतात प्री-बुकिंगसाठी उपलब्ध असणार आहे. तो लवकरच लोकांच्या हातात पडणार आहे. Nokia XR20 याची किंमत (Nokia XR20 Price In India) आणि फीचर्स जाणून घ्या...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोकिया XR20 हा भारतातील विक्रीचा पहिला 5G नोकिया स्मार्टफोन असेल. कंपनीने शेअर केलेल्या टीझर पोस्टरनुसार, प्री-बुकिंग नोकिया पॉवर इयरबड्स लाइटच्या अतिरिक्त फायद्यांसह आणि 1-वर्षाच्या स्क्रीन डॅमेज प्रोटेक्शन प्लॅनसह कोणत्याही अतिरिक्त किंमतीशिवाय येईल. दरम्यान, काही काळानंतर पोस्ट करण्यात आलेला हा टीझर काढून टाकण्यात आला.


Nokia XR20 Price In India


पेजवरुन हटविण्यात आलेला फोन भारतात फक्त 6 जीबी रॅम आणि 128 जीबी अंतर्गत स्टोरेज असलेले उच्च मेमरी मॉडेल मिळेल. हे उपकरण ग्रॅनाइट आणि अल्ट्रा ब्लू दोन्ही रंगांमध्ये उपलब्ध असेल. या फोनची किंमत अद्याप सांगितलेली नाही.


Nokia XR20 Price Specifications


Nokia C30 हा देखील काही काळासाठी लाईव्ह करण्यात आला होता. यातून असे सूचित होत आहे की, हे डिव्हाइस लवकरच भारतात विक्रीसाठी उपलब्ध होईल. लिस्टिंगच्या माध्यमातून माहिती मिळत आहे की भारतीय आवृत्ती अँड्रॉइड 11 गो ऐवजी अँड्रॉइड 11 ओएस वर असेल. हे याचे वैशिष्ट्य आहे. याचे उत्पादन 3GB आणि 4GB RAM सह 32GB किंवा 64GB अंतर्गत स्टोरेजमध्ये देखील येईल. हे हिरव्या आणि पांढऱ्या रंगात उपलब्ध असेल.