Nokia C21 Plus Offers: नोकियाचे फोन त्याच्या बॅटरी लाईफसाठी ओळखले जातात. बॅटरी दीर्घकाळ टिकत असल्याने नोकियाने एक काळ गाजवला आहे. आता पुन्हा एकदा नोकिया मोबाईल (Nokia Mobile) क्षेत्रात आपले पाय घट्ट रोवण्यासाठी सज्ज आहे. एकापेक्षा एक सरस असे फोन बाजारात आणत आहेत. दुसरीकडे फ्लिपकार्टवरील सवलतीमुळे ग्राहकांचा फायदा होत आहे. अशीच एक जबरदस्त ऑफर नोकियाच्या स्मार्टफोन उपलब्ध आहे. तुम्हाला नोकियाचा चांगली बॅटरी लाईफ असलेला स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी आहे. नोकियाचा C21 Plus आज चार्ज केला की, तीन दिवसापर्यंत त्याची बॅटरी चालते. या स्मार्टफोनची किंमत 12 हजार रुपये इतकी आहे. असं असलं तरी फक्त 59 रुपयात फ्लिपकार्टवरून (Flipkart) हा फोन विकत घेता येणार आहे. चला जाणून घेऊयात काय आहे नेमकी ऑफर...


Flipkart Offer: Nokia C21 Plus Offers And Discounts


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोकिया C21 Plus ची लाँचिंग किंमत 11,999 रुपये आहे. मात्र फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन 9799 रुपयात मिळत आहे. या व्यतिरिक्त फोनवर बँक आणि एक्सचेंज ऑफर देखील आहे. त्यामुळे या फोनची किंमत आणखी कमी होते. हा फोन खरेदी करण्यासाठी जर तुन्ही फ्लिपकार्ट एक्सिस बँकचं क्रेडिट कार्ड वापरलं तर 490 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. त्यानंतर या फोनची किंमत 9,309 रुपये इतकी होते. 


बातमी वाचा- Motorola Edge 40 Pro स्मार्टफोनचे फीचर्स लाँचिंगपूर्वीच लीक, जाणून घ्या काय आहे खासियत


Flipkart Offer: Nokia C21 Plus Exchange Offer


नोकिया C21 Plus वर 9250 रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन दिला तर एक्सेंज ऑफर मिळेल. पण यासाठी तुमचा स्मार्टफोन चांगल्या स्थितीत असणं आवश्यक आहे. जर ही ऑफर तुम्हाला मिळाली तर तुम्हाला फक्त 59 रुपयात हा स्मार्टफोन मिळेल.