मुंबई: मोबाईल गरम होऊन त्याचा स्फोट झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामध्ये वन प्लस कंपनीच्या OnePlus Nord 2 या फोनमध्ये दोन वेळा स्फोट झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता या फोनच्या चार्जरमध्ये स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे आता लोक या कंपनीचा हा फोन घेण्यासही घाबरत असल्याची चर्चा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

OnePlus Nord 2 मोबाईल वापरणाऱ्या एक ग्राहकाने चार्जरचा स्फोट झाल्याचं सोशल मीडियावर फोटोसह पोस्ट लिहिली आहे. त्याने आपलं दु:ख पोस्टसोबत शेअर केलं आहे. यापूर्वी मोबाईल फुटल्यानंतर कंपनीने दोन्ही ग्राहकांकडून फोन मागवून घेण्याचे प्रयत्न केले होते. मात्र त्यापैकी एक वकील असल्याने त्यांनी कंपनीविरोधात तक्रार करण्याचा दावा केला होता. त्यानंतर आता दुसऱ्या ग्राहकाच्या चार्जरमध्ये स्फोट झाल्यानं खळबळ उडाली. 


स्मार्टफोनचे मालक जिमी जोस यांनी ट्विटरवर ही घटना सांगितली आणि काही फोटो देखील शेअर केला आहे. जोसच्या म्हणण्यानुसार, वनप्लस नॉर्ड 2 चार्जर सॉकेटमध्ये घातला. त्यानंतर मोठा आवाज झाला. त्याने पाहिलं तर चार्जरचा स्फोट झाल्याचं लक्षात आलं. जोसने पुष्टी केली की अडॅप्टर अद्याप कार्यरत आहे. तसेच वनप्लस नॉर्ड 2 देखील चांगले काम करत आहे. 


वन प्लस कंपनीला टॅग करत, जिमी जोसने ट्विटरवर लिहिले, 'मला याकडे तुमचे त्वरित लक्ष वेधायचे आहे. माझ्या OnePlus Nord 2 चा चार्जर मी सॉकेटमध्ये ठेवताच स्फोट झाला. सुदैवाने मी हे ट्विट करण्यासाठी जिवंत आहे. नॉर्ड 2 देखील कार्यरत आहे. पण हे खूप भीतीदायक आहे मी स्वत: अजून यातून स्वत:ला सावरत आहे. 



वन प्लसच्या प्रतिनिधीशी जोसने संवाद साधला त्यावेळी त्याला जवळच्या केअर सेंटरमध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आला. याशिवाय वोल्टेज फ्लकचुएशनमुळे स्फोट झाला असावा असंही या वन प्लसच्या प्रतिनिधिंचं म्हणणं होतं. यावेळी त्यांनी कंपनीची चूक नसावी तो व्होल्टेजचा प्रॉब्लेम असावा हे दाखवून देण्याचा पुरेपुर प्रयत्न केल्याचा दावा जोसने केला.