आता तुम्हाला गाडी चालवण्यासाठी पेट्रोल, डिझेल किंवा सीएनजीची गरज लागणार नाही. कारण तुमची कार पाण्यावर चालणार आहे. काही वर्षांपूर्वी रेल्वे गाड्या या पाण्याच्या वाफेवर चालणाऱ्या इंजिनांनीच ओढल्या जात होत्या.  जपानसह अनेक देशांतील लोकांनी पाण्यावर चालणाऱ्या कार बनवण्याचा दावा केला होता. मात्र, या दाव्यानंतर पाण्यावर चालणारी कार अद्याप बाजारात आली नाही. परंतु जर लोकांचे दावे तांत्रिक पातळीवर खरे ठरले तर पाण्यावर चालणारी कार ही जगातील सर्वात गेम चेंजर कार ठरणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलिया आणि इस्रायल यांच्या संयुक्त उपक्रमाने पाण्यावर चालणारी कार बनवण्याची घोषणा केली होती. जी इस्रायली तंत्रज्ञानासह हायड्रोजनवर आधारित असणार होती. मात्र, आत्तापर्यंत अनेक कंपन्यांनी पाण्यावर चालणाऱ्या कारचा दावा केला असला तरी अजूनही या तंत्रज्ञानात अनेक अडथळे येत असल्याची माहिती येत आहे. 


पाण्यावर चालणाऱ्या कारचा दावा


जेनेसिस एनर्जीने 2002 मध्ये घोषित केले की त्यांनी एक कार डिझाइन केली आहे. जी हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळे करून ऊर्जा मिळवेल आणि नंतर पाण्याच्या स्वरूपात पुन्हा एकत्र करेल. कंपनीने यासाठी गुंतवणूकदारांकडून 25 लाख डॉलर्सही घेतले. मात्र, पाण्यावर चालणारी कार अजूनही रस्त्यावर येऊ शकली नाही.  


जपानी कंपनीचा दावा:


जपानी कंपनी जेनपेक्सने 2008 मध्ये त्यांचे वाहन केवळ पाण्यावर आणि हवेवर चालण्यास सक्षम असल्याचा दावा केला होता. परंतु या कारवर सध्या बरेच काम करावे लागणार आहे. 



पाण्यावर गाडी चालू शकेल का? 


मोठ्या शक्तीने जेव्हा पाणी सांडले जाते तेव्हा ऊर्जा तयार होते. जी जलविद्युत प्रकल्प आणि धरणांमध्ये वापरली जाते. अनेक मोठ-मोठ्या धरणांमध्ये टर्बाइनवर पाणी सोडले जाते. ज्यातून वीज निर्माण होते. मग कारमध्ये वीज निर्माण कशी करायची. हे करणं खूप कठीण असणार आहे.