किम जोंग उनची सिक्रेट लँब अखेर जगासमोर , फोटो पाहुन जग हादरले

काही दिवसांपूर्वी किम जोंग उन यांनी या गुप्त ठिकाणाला भेट दिली होती.

Sep 14, 2024, 17:13 PM IST

उत्तर कोरीया हा देश त्यांचा अण्विक कार्यक्रम गुप्तच ठेवतो. मग हे फोटो जगासमोर कसे आले ? 

1/7

कायम चर्चेत

उत्तर कोरीया हा देश त्याच्या अणू चाचण्या किंवा इतर वैज्ञानिक चाचण्यांसाठी कायम चर्चेत असतो. मात्र या चाचण्यांविषयीची माहिती किंवा छायाचित्रे उत्तर कोरीयाने यापूर्वी कधीच जगजाहीर केलेली नाही.  

2/7

उत्तर कोरीया

उत्तर कोरीया हा देश त्यांचा अण्विक कार्यक्रम फार गुप्तपणे हाताळतो. शक्यतो उत्तर कोरीयाच्या अण्विक हलचालींबरोबरच वैज्ञानिक, तंत्रज्ञ इतकेच काय तर लष्करी हलचालींसंदर्भातील कोणताही तपशील, ठिकाणे किंवा इतर कोणतीही माहिती कधीच उघड केली जात नाही.  

3/7

अण्विक कार्यक्रम

या मुळेच उत्तर कोरीयावर जगभरातील अनेक देशांनी निर्बंध लादले आहेत. तरीही या देशाचा अण्विक कार्यक्रम सुरुच असतो. अशाच एका अण्विक केंद्राचे फोटो सध्या समोर आले असून या फोटोंमध्ये येथील प्रमुख नेता आणि हुकूमशाह किम जोंग उन वैज्ञानिकांबरोबर सल्लामसलत करताना दिसतोय.  

4/7

व्हायरल फोटो

हा फोटो उत्तर कोरीयाच्या परमाणू केंद्रातील असल्याचं सांगितलं जात आहे. ही जागा यूरेनियम एनरिचमेंट म्हणजेच यूरेनियम या अण्विक पदार्थांची शक्ती अधिक वाढवण्यासंदर्भातील प्रक्रिया करण्यासाठीची प्रयोगशाळाच आहे. या जागेत मोठ्याप्रमाणात सेंट्रीफ्यूज लावण्यात आल्याचा दावा केला जात आहे. सदर मशीन विस्फोटक बनवण्यासाठी लागणारे साहित्य तयार करण्यासाठी वापरली जाते. 

5/7

गुप्त ठिकाणाला भेट

काही दिवसांपूर्वी किम जोंग उन यांनी या गुप्त ठिकाणाला भेट दिली होती. उत्तर कोरीयाने जपानच्या समुद्रात '600 मि.मी. मल्टीपल लॉन्च रॉकेट सिस्टीम'चे यशस्वी परीक्षणदेखील केले आहे. 

6/7

किम जोंग उन यांचा वैज्ञानिकांना सल्ला

किम जोंग उन यांनी वैज्ञानिकांना जेवढी जमतील तेवढी परमाणू शस्त्रे बनवायण्याचा सल्ला दिला आहे. लवकरात लवकर अण्विक साहित्यात वाढ झाली पाहिजे, असं ते म्हणाले आहेत. नंतर त्यांनी 'न्यूक्लियर वेपन इंस्टीट्यूट'ला पण भेट दिली. तिथल्या वैज्ञानिकांना त्यांनी 'वेपन-ग्रेड न्यूक्लियर मटेरीयल' बनवायला सांगितलं आहे. 

7/7

उत्तर कोरीयाची अशी छायाचित्रे प्रथमच समोर

इतक्या वर्षात असे पहिल्यांदा झाले आहे की, उत्तर कोरीयाच्या आण्विक कार्यक्रमाशीसंबंधित छायाचित्रे अशी सार्वजनिकरित्या पहायला मिळाली आहेत. हे फोटो समोर आल्याने जगभरातील देशांचं टेन्शन वाढलं असून किम जोंग उन हे त्यांच्या क्षणिक आणि टोकाच्या निर्णयांसाठी ओळखले जात असल्याने त्यांच्याकडून या घातक शस्रांचा गैरवापर होण्याची भिती जगातील महासत्ता असलेल्या अमेरिकेलाही कायमच असते.