आता हॉटेलमध्ये जाताना खरे आधारकार्ड दाखवायची गरज नाही ! नक्की काय आहे ही सुविधा एकदा बघाच
Masked Aadhaar Card: मास्क केलेले आधार कार्ड हे तुमच्याच आधार कार्डचे सुधारित स्वरूप आहे. ज्यात तुमच्या आधार नंबरचे पहिले आठ अंक तुम्ही लपवलेले असतात. आणि फक्त शेवटचे चार अंक समोरच्याला दिसतात. यामुळे तुमची वैयक्तिक माहिती लोकांना पूर्णपणे दिसणार नाही आणि तुम्ही सुरक्षित राहाल.
Need of Masked Aadhaar Card?: आजच्या काळात आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे खुप गरजेचे आहे. मग तुम्ही श्रीमंत असाल किंवा गरीब, लोकप्रिय असाल किंवा सामान्य तुम्ही काळजी घेणे आवश्यक आहे. अनेक लोक विचार न करता आपली वैयक्तिक माहिती धोक्यात टाकतात. जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये आपले आधारकार्ड देतात. मग ते ओयो हॉटेल असेल किंवा इतर कोणत्याही हॉटेलमध्ये तुम्ही रूम बुक करत असाल, तिथे तुम्हाला आधारकार्ड द्यावेच लागते. अनेकांना असे वाटते की यात काय एवढं? पण हे सुरक्षित नाही, असे केल्यास तुमच्या आधारकार्डवरील माहितीची चोरी होऊ शकते. आणि यामुळे तुमची फसवणूकही होऊ शकते. तुम्ही अनेक सायबर क्राईम, बॅंकेतून पैसे चोरी होणे यासारख्या गुन्ह्यांचे शिकार होऊ शकता.
मास्क आधारकार्ड काय आहे?
मास्क आधारकारर्ड हे तुमच्याच आधारकर्डचे बदललेले स्वरूप आहे. ज्यातले पहिले आठ अंक आपण लपवू शकतो आणि शेवटचे चार अंकच दाखवू शकतात. यामुळे तुमची वैयक्तिक माहिती लोकांपर्यंत पोहोचू शकणार नाही आणि सुरक्षितही राहिल. जर तुम्हाला माहित नसेल की मास्क आधारकार्ड काय आहे आणि याचा वापर कसा करायचा तर ही माहिती पूर्ण वाचा.
आधारकार्ड ही तुमची ओळख आहे आणि हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. हे ओळखपत्र भारतात सगळ्यांकडे असणे गरजेचे आहे. आधारकार्ड नंबर ही आपली खासगी माहिती आहे, त्यामुळे ते आपण जपून ठेवायला पाहिजे. जेणेकरून याचा वापर करून कोणी तुमची फसवणूक करू शकणार नाही किंवा तुमच्या माहितीचा चुकीचा वापर होणार नाही. मास्क आधार कार्डचा वापर करून तुम्ही तुमच्या आधार नंबरचे काही अंक लपवू शकता. यामुळे तुमचा आधार नंबर जास्त सुरक्षित राहील. आणि तुम्हाला तुमचे मूळ आधारकार्ड कोणाला दाखवावे लागणार नाही.
हेही वाचा : तुमचा फोन खरंच लपूनछपून बोलणं ऐकतोय? मार्केटिंग कंपनीनेच केला सर्वात मोठा खुलासा!
मास्क आधारकार्ड कसे डाऊनलोड कराल?
- UIDAI या वेबसाईटवर जा
- 'माझे आधार' (My Aadhaar) यामध्ये 'डाऊनलोड आधार' यावर क्लिक करा
- तुमचा आधार नंबर टाका आणि सुरक्षा कोड टाकून ओटीपी पाठवा यावर क्लिक करा.
- आधारकार्डशी लिंक असलेल्या तुमच्या फोन नंबरवर ओटीपी येईल तो दिलेल्या जागी टाका.
- व्हेरीफायवर क्लिक करून डाऊनलोड म्हणा.
- मास्क आधारकार्डचा पर्याय निवडा
- मास्क आधारकार्डची पीडीएफ डाऊनलोड करा.
मास्क आधारकार्डचा वापर कसा करावा?
- हॉटेलमध्ये चेक इन किंवा चेक आऊट करताना या मास्क आधारकार्डचा वापर करा.
- प्रवास करताना विमानतळावर स्वतःची ओळख दाखवण्यासाठीही मास्क आधारचा वापर तुम्ही करू शकता