Netflixवर मोफत पाहा चित्रपट, वेब सीरिज; जाणून घ्या कसं?
ओटीटी प्लॅटफॉर्मचे दर्शक वेगाने वाढले आहेत.
मुंबई : गेल्या वर्षापासून सर्व चित्रपटगृह बंद आहेत. त्यामुळे कित्येकांनी ऑटीटी प्लॅटफॉर्मकडे आपला मोर्चा वळवला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मचे दर्शक वेगाने वाढले आहेत. त्यापैकी सर्वात लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणजे Netflix. Netflixवर आपण आपल्या आवडीचे चित्रपट वेब सीरिज पाहू शकतो.
या पेड ऍपवर जर का तुम्ही चित्रपट आणि वेबसीरिज मोफत पाहू शकता. ज्यासाठी तुम्हाला Netflixचं सब्सक्रिप्शन घ्यावं लागतं. पण एक पर्याय आहे ज्यामुळे तुम्ही मोफत तुमच्या आवडीचा चित्रपट किंवा वेब सीरिज पाहू शकता.
मिळालेल्या रिपोर्टनुसार, Netflix काही चित्रपट आणि वेब सीरिज मोफत पाहू शकता. जेव्हा तुम्ही एखाद्या चित्रपटावर किंवा सीरिजवर क्लिक कराल त्यानंतर तुम्हाला फ्री स्ट्रीमिंगचा पर्याय दिसेल. सर्वात आधी तुम्हाला netflix.com/watch-free भेट द्यावी लागेल.
त्यानंतर एक पेज ओपन होईल. ज्या चित्रपटाच्या किंवा सीरिजसमोर ‘वॉच नाऊ’ असं ऑप्शन तिथे क्लिक करा. त्याठिकाणी तुम्ही फ्रीमध्ये चित्रपट किंला सीरिज पाहू शकता.