येत आहे काही मिनिटांत फुल चार्ज होणारा फोन; तो कधीच होणार नाही हॅंग, जाणून घ्या फीचर्स
Nubia पुढील आठवड्यात (6 सप्टेंबर) Red Magic 6S Pro फोन लॉन्च करणार आहे.
मुंबई : Nubia पुढील आठवड्यात (6 सप्टेंबर) Red Magic 6S Pro फोन लॉन्च करणार आहे. आता, एका नवीन अनबॉक्सिंग व्हिडिओने स्मार्टफोनचे डिझाइन तसेच काही फीचर्स लिक झाली आहेत. झोलोटेकच्या नवीन व्हिडिओमध्ये, टेक यूट्यूबरने (YouTuber) रेड मॅजिक 6 एस प्रोचा संपूर्ण अनबॉक्सिंग व्हिडिओ शेअर केला. तसेच नवीन हँडसेट बद्दल आपले विचार शेअर केले. ( Nubia to launch Red Magic 6S Pro phone next week)
Red Magic 6S Proचे स्टोरेज
YouTuber ने उघड केले की 6S प्रो काही स्टोरेज प्रकारांमध्ये लॉन्च होईल, ज्यात "सायबोर्ग 12 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज," "सायबोर्ग 16 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज" आणि "घोस्ट 16 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज" प्रकार समाविष्ट आहेत.
Red Magic 6S Pro
YouTuber ची अनबॉक्स केलेली आवृत्ती 128GB स्टोरेजसह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888+ दाखवत आहे. यात FHD+ रिझोल्यूशनसह 6.8-इंच AMOLED डिस्प्ले 165Hz रिफ्रेश रेट आणि जास्तीत जास्त ब्राइटनेस 700 nits आहे. फ्रन्ट पॅनलमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट रीडर देखील आहे.
Red Magic 6S Proचा कॅमेरा
मागील बाजूस, 6S प्रो 64-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि दुसरा 2-मेगापिक्सलचा सेन्सरसह ट्रिपल कॅमेरा सेटअप दिसतो. झोलोटेकच्या मते, फोनमध्ये 5,050mAh ची बॅटरी आहे जी 120W एअर-कूल्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन खास गेमिंग प्रेमींसाठी बनवण्यात आला आहे. तासभर खेळल्यानंतरही हा फोन गरम होणार नाही.