अमित की आदित्य? कोणत्या ठाकरेंकडे अधिक संपत्ती? आकडेवारी आली समोर

अमित आणि आदित्य ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधुंनी निवडणूक आयोगाकडे आपल्याकडील संपत्तीचा खुलासा केला आहे. कोणाकडे किती संपत्ती आहे? जाणून घेऊया. 

| Oct 28, 2024, 21:54 PM IST

Aditya and Amit Thackeray Networth: अमित आणि आदित्य ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधुंनी निवडणूक आयोगाकडे आपल्याकडील संपत्तीचा खुलासा केला आहे. कोणाकडे किती संपत्ती आहे? जाणून घेऊया. 

1/14

ठाकरेंची तिसरी पिढी! अमित की आदित्य? कोणत्या ठाकरेंकडे अधिक संपत्ती? आकडेवारी आली समोर

Maharashtra Assembly Election Aaditya Thackeray and Amit Thackeray Property networth

Aaditya And Amit thackeray Property: ठाकरेंची तिसरी पिढी निवडणुकीच्या रिंगणात आहे. उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभेतून तर राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे माहिम विधानसभेतून निवडणूक लढवत आहेत. 

2/14

निवडणूक आयोगाला दिली माहिती

Maharashtra Assembly Election Aaditya Thackeray and Amit Thackeray Property networth

निवडणूक आयोगात उमेदवारी अर्ज सादर करताना उमेदवारी अर्जासोबतच उमेदवाराला प्रतित्रापत्र ही द्यावं लागत. प्रतिज्ञापत्रात उमेदवाराच्या नावावर किती संपत्ती आहे याची माहिती देणं बंधनकारक असतं. यावेळी दोघांनीही आपल्याकडील संपत्तीचा खुलासा केला आहे. कोणाकडे किती संपत्ती आहे? जाणून घेऊया.

3/14

चल, अचल संपत्ती

Maharashtra Assembly Election Aaditya Thackeray and Amit Thackeray Property networth

आदित्य ठाकरे यांनी प्रतित्रापत्रात दिलेल्या माहितीनुसार चल संपत्ती 15 कोटींहून जास्त तर स्थावर मालमत्ता  6 कोटी 4 लाख रुपयांची असल्याचं नमुद केलं आहे. 

4/14

रायगड इथं जागा

Maharashtra Assembly Election Aaditya Thackeray and Amit Thackeray Property networth

आदित्य ठाकरे यांच्या नावावर रायगड इथं काही एकर जागा आहे. ज्याचं आताचं बाजार मूल्य 1 कोटी 48 लाख 51 हजार 350 रुपये आहे. आदित्य ठाकरे यांच्या नावावर ठाकुर्ली आणि घोडबंदर इथं दोन दुकानांचे गाळे आहेत. ज्याचं आताचं बाजार मूल्य 4 कोटी 56 लाख रुपये इतकं आहे.

5/14

जंगम, स्थावर मालमत्ता

Maharashtra Assembly Election Aaditya Thackeray and Amit Thackeray Property networth

आदित्य ठाकरे यांच्याकडे BMW कार आहे. 1 कोटी 91  लाख 7  हजार 159  रुपयांचे दागिने आहेत. त्यांच्याकडे जंगम मालमत्ता  - 15  कोटी 43 लाख 3  हजार 60 रुपये, स्थावर मालमत्ता 6 कोटी 4 लाख 51 हजार 350 रुपये इतकी आहे. 

6/14

बँक खात्यात किती?

Maharashtra Assembly Election Aaditya Thackeray and Amit Thackeray Property networth

आदित्य ठाकरेंनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या बँक खात्यात 2 कोटी 44 लाख 18 हजार 985 रुपये आहेत.बँक खात्यात फिक्स डिपॉजिट 2 कोटी 81 लाख 20 हजार 723 रुपयांची आहे.

7/14

शेअर मार्केट गुंतवणूक

Maharashtra Assembly Election Aaditya Thackeray and Amit Thackeray Property networth

आदित्य ठाकरेंची शेअर मार्केट गुंतवणूक  70 हजार रुपयांची, म्युच्युअल फंडमध्ये 10  कोटी 13 लाख 78  हजार 52 रुपये तर बॉण्ड्स - 50 हजार रुपयांची गुंतवणूक आहे.

8/14

वैयक्तिक एकूण गुंतवणूक

Maharashtra Assembly Election Aaditya Thackeray and Amit Thackeray Property networth

आदित्य ठाकरेंची वैयक्तिक एकूण गुंतवणूक 10 कोटी 14 लाख 98 हजार 52 रुपयांची आहे. त्यांच्याकडे 21 लाख 55 हजार 741 रुपयांची एलआयसी पॉलिसी आहे.

9/14

1 गुन्हा दाखल

Maharashtra Assembly Election Aaditya Thackeray and Amit Thackeray Property networth

आदित्य ठाकरे यांच्यावर 1 गुन्हा दाखल आहे. असे असले तरी याप्रकरणी त्यांच्यावर चार्जशीट दाखल झालेलं नाही. डिलाईल रोड खुला केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय.

10/14

जंगम, स्थावर मालमत्ता

Maharashtra Assembly Election Aaditya Thackeray and Amit Thackeray Property networth

अमित राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे एकूण 12 कोटी 54 लाख इतकी जंगम मालमत्ता आहे. एकूण स्थावर मालमत्ता 1 कोटी 29 लाख रुपये इतकी आहे. त्यांचा ऑपरेशन अँड टेक्निकल एक्झ्युक्यूटीव्ह असा व्यवसाय आहे.

11/14

4 कोटी 19 लाख रुपयांचे कर्ज

Maharashtra Assembly Election Aaditya Thackeray and Amit Thackeray Property networth

अमित ठाकरे यांच्यावर एकूण 4 कोटी 19 लाख रुपयांचे कर्ज आहे. अमित ठाकरे यांच्याकडे 1 लाख 8 हजार इतकी रोख रक्कम आहे. त्यांच्या बॅंकेत 40 लाख 99 हजार 763 रुपये इतकी रक्कम बॅंकेत आहे. 

12/14

नावावर एकही गाडी नाही

Maharashtra Assembly Election Aaditya Thackeray and Amit Thackeray Property networth

निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, अमित ठाकरे यांच्याकडे 6 कोटी 29 लाखांच्या ठेवी आहेत.3 कोटी 98 लाखांचे शेअर्स, पोस्ट खात्यात 20 लाख आणि ३ तोळे सोने आहे. अमित ठाकरेंच्या नावावर एकही गाडी नाही तसेच त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही.

13/14

पत्नी आणि मुलाच्या नावे

Maharashtra Assembly Election Aaditya Thackeray and Amit Thackeray Property networth

पत्नी मिताली ठाकरेच्या नावे एकूण जंगम मालमत्ता 1 कोटी 72 लाख, स्थावर मालमत्ता 58 लाख 38 हजार 578 इतकी आहे. त्यांच्याकडे  5 कोटी 93 लाखाच्या ठेवी आहेत. म्युचूअल फंडमध्ये 52 लाख तर 9 तोळ्यांचे सोने आहे. मुलाच्या नावावर 70 हजार तर मुलाच्या नावे म्युच्यूअल फंडात 60 लाख रुपये आहेत.

14/14

भागीदारी

Maharashtra Assembly Election Aaditya Thackeray and Amit Thackeray Property networth

अमित ठाकरे यांची तथास्तु बिल्डर्समध्ये 20 टक्के भागिदारी, सह्याद्री फिल्ममध्ये 50 टक्के शेअर्स भागीदारी आहे.