'हा' आहे जगातील सर्वात लांबलचक चित्रपट... पाहण्यासाठी लागतील तब्बल 3 दिवस आणि 15 तास

Worlds Longest Film In History : मनोरंजन म्हणून चित्रपट पाहायला सर्वांनाच आवडतं. पण तुम्ही पाहिलेला सर्वात लांब चित्रपट जास्तीत जास्त तीन किंवा सव्वा तीन तासांचा असेल. पण तुम्हाला आम्ही जगातील अशा चित्रपटाविषयी सांगणार आहोत जो पाहण्यासाठी तब्बल 3 दिवस आणि 15 तास लागतात. जगातील सर्वात लांब चित्रपट म्हणून याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा करण्यात आलेली आहे. 

| Oct 28, 2024, 19:42 PM IST
1/5

चित्रपट बनवणारे लोक सहसा या गोष्टीची काळजी घेतात की चित्रपट तेवढाच लांब बनवावा जो पाहताना प्रेक्षकांना कोणतीही अडचण किंवा कंटाळा येणार नाही . बरेचदा चित्रपट हे 2 किंवा अडीच तासांचे असतात. तर कधीकधी जास्तीत जास्त तीन ते सव्वा तीन तास, पण आज तुम्हाला अशा चित्रपटाविषयी सांगणार आहोत जो पाहण्यासाठी तुम्हाला 87 तासांचा वेळ काढावा लागेल.   

2/5

आज आम्ही तुम्हाला अशा चित्रपटाविषयी सांगणार आहोत जो 1987 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे नाव 'द क्योर फॉर इंसोमनिया' हे असून हा हॉलिवूड मधील एक युनिक चित्रपट आहे. हा चित्रपट जगातील सर्वात जांब चित्रपट म्हणून ओळखला जातो. एवढा लांबलचक चित्रपट पाहणं हा एक वेगळा अनुभव आहे. इतकंच नाही तर या चित्रपटाच्या कथेपासून ते सीन्सपर्यंत सगळंच अनोखं आहे.

3/5

चित्रपटाची कथा ही निद्रानाशाच्या समस्येशी संबंधित आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून झोपेची कमतरता आणि त्यासंबंधीचा संघर्ष समजून घेता येतो. हा चित्रपट अशा लोकांवर आधारित आहे ज्यांना झोपेची समस्या असते. या चित्रपटात एक प्रयोग दाखवण्यात आला असून ज्यात बायोलॉजिकल क्लॉक ठीक केला जाऊ शकतो ज्यामुळे व्यक्ती चांगली झोप घेऊ शकतो. 

4/5

'द क्योर फॉर इंसोमनिया' हा चित्रपट जॉन हेन्री टिमिस यांनी प्रदर्शित केला असून त्याचा रनटाइम 5220 मिनिटं आहे. यात कथा किंवा कथानक नसून चित्रपटात, कलाकार एलडी ग्रोबन हे 4080 पानांच्या कविता वाचतात. हा चित्रपट पहिल्यांदा शिकागोच्या स्कूल ऑफ आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये पहिल्यांदा दाखवण्यात आला होता. या चित्रपटातमध्ये काही पोर्नोग्राफिक कंटेंट सुद्धा सामील आहेत.   

5/5

हा चित्रपट 31 जानेवारीला 1987 ला रिलीज झाला होता आणि 3 फेब्रुवारी 1987 पर्यंत याची स्क्रीनिंग चालली. हा चित्रपट कोणत्याही ब्रेक शिवाय 3 दिवस आणि 15 तास सुरु होता. या चित्रपटाची कथा ही निद्रानाशावर आधारित असल्याने या चित्रपटाचे नाव सुद्धा यावरूनच देण्यात आले आहे.