Electric Scooters: गेल्या काही दिवसात एकापेक्षा एक सरस अशा इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्यात आल्या आहेत. ग्राहकांची मागणी पाहता कंपनीने हे पाऊल उचललं आहे. हीरो मोटोकॉर्पने नुकतीच आपली इलेक्ट्रिक टू व्हीलर लाँच केली आहे. या स्कूटरचं नाव Hero Vida V1 असं असून दोन व्हेरियंट आहेत. यात V1 Plus आणि V1 Pro या व्हेरियंटचा समावेश आहे. असं असलं या व्यक्तिरिक्त ग्राहकांकडे पर्याय उपलब्ध आहेत. यात Ola S1 Pro आणि Ather 450X या इलेक्ट्रिक स्कूटरचा समावेश आहे. त्यामुळे या तीनपैकी कोणती इलेक्ट्रिक स्कूटर निवडायची असा प्रश्न दुचाकीप्रेमींपुढे आहे. चला जाणून घेऊयात या तीन इलेक्ट्रिक स्कूटरबाबत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Hero Vida: हीरो Vida V1 Plus बेस व्हेरियंट आहे. तर हीरो Vida V1 Pro हे टॉप व्हेरियंट आहे. बेस व्हेरियंटची Vida V1 Plus ची किंमत 1,45,000 रुपये आहे. तर Vida V1 Pro व्हेरियंटची किंमत 1,59,000 रुपये आहे. या दोन्ही किमती एक्स शोरुम आहेत. ही स्कूटर सिंगल चार्जवर 165 किमी रेंज देऊ शकते, असा कंपनीचा दावा आहे. या गाडीची बुकिंग 10 ऑक्टोबरपासून सुरू झाली होती. 


Ola S1 Pro: ओला S1 Pro सर्वात चर्चित इलेक्ट्रिक स्कूटर आहे. काही त्रुटी असूनही बेस्ट सेलर स्कूटर्सपैकी एक आहे. ओला एस1 प्रो ची किंमत 1.40 लाख (एक्स शोरुम) रुपये आहे. ही गाडी Vida V1 Plus पेक्षा थोडी स्वस्त आहे. Vida V1 Pro पेक्षा 19,000 रुपयांनी स्वस्त आहे. 


बातमी वाचा- Upcoming Cars: नवीन कार खरेदी करायच्या विचारात आहात! या पाच कार जानेवारीत होणार लाँच


Ather 450X: भारतीय इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात एथर 450X नं आपली ओळख निर्माण केली आहे. स्पोर्टी लूक आणि परफॉर्मेंसच्या जोरावर बाजारात पकड निर्माण केली आहे. नुकतंच या गाडीचं अपडेटेड वर्जन लाँच झालं आहे. या गाडीची किंमत 1.55 लाख रुपये एक्स शोरुम आहे. 


Hero Vida, Ola S1 Pro आणि Ather 450X ची किंमत


  • Hero Vida V1 Plus- 1,45,000 रुपये

  • Hero Vida V1 Pro- 1,59,000 रुपये

  • Ola S1 Pro- 1,39,999 रुपये

  • Ather 450X- 1,55,657 रुपये