Upcoming Cars: नवीन कार खरेदी करायच्या विचारात आहात! या पाच कार जानेवारीत होणार लाँच

Upcoming Cars In January 2023: कोरोनानंतर वाहन उद्योगासाठी 2022 हे वर्ष चांगलं राहिलं आहे. अनेक नवीन गाड्या बाजारात आल्या असून विक्रीही चांगली झाली. आता नवं वर्ष सुरु होण्यासाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. नव्या वर्षात पाच गाड्या लाँच होणार आहेत. टोयोटा इनोव्हा हायक्रॉस, महिंद्रा XUV400, मारुती बलेना क्रॉस, MG हेक्टर आणि Citroen C3 EV यांचा समावेश आहे.

Nov 28, 2022, 15:10 PM IST
1/5

Top five Upcoming Cars

TOYOTA INNOVA HYCROSS नुकतीच सादर करण्यात आली आहे. ही गाडी दोन इंजिन पर्यायांसह येईल. यात 2.0L NA पेट्रोल (नॉन-हायब्रिड) आणि 2.0L पेट्रोल (हायब्रिड) पर्याय असेल. ही गाडी जानेवारी 2023 मध्ये लाँच होणार आहे. या गाडीचा मायलेज 21.1kmpl पर्यंत असेल.  

2/5

Top five Upcoming Cars

MAHINDRA XUV400 ही गाडी सप्टेंबर 2022 मध्ये सादर करण्यात आली होती. आता जानेवारी 2023 मध्ये लाँच केली जाणार आहे. ही गाडी XUV300 कॉम्पॅक्ट एसयूव्हीवर आधारित आहे. यात 39.4kWh चा बॅटरी पॅक मिळेल. पूर्ण चार्जवर 456km पर्यंतची रेंज देऊ शकते.

3/5

Top five Upcoming Cars

मारुति एका नवीन कूप एसयूव्हीची चाचणी करत आहे. या गाडीचे नाव BALENO CROSS असू शकते. सध्या, सांकेतिक नाव YTB आहे. जानेवारीमध्ये होणाऱ्या ऑटो एक्सपो 2023 मध्ये हे सादर केले जाऊ शकते. (प्रतिनिधीक फोटो)

4/5

Top five Upcoming Cars

नवीन एमजी हेक्टर फेसलिफ्ट 5 जानेवारी रोजी लाँच केली जाऊ शकते. यामध्ये अनेक बदल पाहायला मिळतील. एसयूव्हीला नवीन मोठी आणि आकर्षक ग्रिल मिळेल. यासोबतच सेगमेंटमध्ये सर्वात मोठी 14-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम उपलब्ध असेल.

5/5

Top five Upcoming Cars

CITROEN C3 EV देखील जानेवारीमध्ये लाँच केले जाऊ शकते. हे C3 हॅचबॅकवर आधारित असेल. त्याची किंमत 10 लाख ते 15 लाख रुपये असू शकते.