मुंबई : Ola ने आपल्या इलेक्ट्रिक  Ola Scooter ची बुकिंग सुरू केली आहे. या बुकिंगसाठी ग्राहकांना फक्त 499 रुपये भरावे लागणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Ola Scooter ला कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर फक्त 499 रुपयांत बुक करता येणार आहे. ही रक्कम देखील पूर्णतः रिफंडेबल असणार आहे. जे लोक लवकर बुकिंग करतील त्यांना डिलिवरीमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे.



Ola Scooter बनवणारी फ्युचर फॅक्टरी जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक 2 व्हिलर बनवणारी फॅक्टरी आहे. दरवर्षी 1 कोटी 2 व्हिलर बनवण्याची क्षमता या फॅक्टरीत आहे.पहिल्या टप्प्यात फॅक्टरीमध्ये प्रत्येकवर्षी 20  लाख 2 व्हिलर स्कूटर बनवण्यात येणार आहे.



ओलाचा दावा आहे की, Ola Scooter फक्त 18 मिनिटात 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होते. पूर्ण चार्ज केल्यास स्कूटर 150 किमी  पर्यंत धावू शकते.



आतापर्यंत जेवढ्या स्कूटर बाजारात आहेत त्या सर्वांमध्ये डिक्कीत फक्त एक हेल्मेट बसू शकते. Ola Scooterमध्ये डिक्की मोठी असणार आहे. 



नुकतेच Ola चे चेअरमन भाविश अग्रवाल यांनी बँगळुरूच्या रस्त्यावर Ola Scooter ची राईड घेताना दिसून आले होते. साधारण जुलैच्या अखेरिस किंवा ऑगस्टच्या सुरूवातील ही बाईक बाजारात लॉंच होणार आहे.