गुडगाव : ओला अॅपमुळे अनेकदा प्रवास करताना तुम्हाला त्रास होतो, मुजोर चालकाच्या मनमानीलाही अनेक जण वैतागले आहेत. मात्र ओलाने एका प्रवाशाशी म्हणजेच ग्राहकाला कशी वागणूक दिली पाहा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरियाणा गुडगावमधील अभिषेक अस्थाना यांनी ओला बुक केली, पण चालकाने परस्पर राईड रद्द केली, यामुळे अभिषेक यांनी ओला बुकिंग केल्याचे त्यांचे पैसे कापले गेले.


अभिषेक यांनी ट्वीट केलं, आणि ओलाला मेन्शन करत लिहिलं, हे काय मी दुकानदाराकडे समोसा मागितला, त्याने समोसा संपल्याचं सांगितलं, आणि समोस्याचे पैसेही घेतले.


यावर ट्वीटर काही तासात ओलाने उत्तर दिलं, अभिषेक यांना झालेल्या त्रासाबद्दल माफी मागितली, तसेच तुमचे कापले गेलेले पैसे आम्ही तुम्हाला परत देत आहोत, ते पैसे खात्यात परत जमा करण्यात आले.


यानंतर मात्र ओलाने समोसे कुठे पाठवायचे असं विचारलं आणि अभिषेक यांच्या घरी ओलाकडून दोन दिवसांनी समोसे आणि माफीचं पत्र पाठवण्यात आलं.