मुंबई : वनप्लस 6 च्या यशानंतर कंपनी पुन्हा एकदा नवा स्मार्टफोन घेऊन बाजारात उतरत आहे. कंपनी हा फोन पुढच्या महिन्यात बाजारात आणत आहे. वनप्लस 6 T शी संबंधित जाहिरातीही टीव्हीवर दिसू लागल्या आहेत. या स्मार्टफोनमध्ये कोणते फिचर्स असणार याबद्दल जाणून घेऊया.


17 ऑक्टोबरला लॉन्च 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 कंपनी हा स्मार्टफोन जगभरात 17 ऑक्टोबरला लॉन्च करणार आहे. स्मार्टफोनच्या जाहिरातीचा एक फोटो कंपनीतर्फे समोर आणण्यात आला. त्यामध्ये 17 ऑक्टोबर ही तारीख दिली आहे. यापुढच्या स्मार्टफोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असणार आहे. कंपनीने याला स्क्रीन अनलॉक नाव दिलयं. 


खास फिचर्स 


वनप्लस 6 टीमध्ये हेडफोन जॅकसाठी कोणती जागा नसणार आहे. जॅक हटविल्याने जास्त स्पेस मिळाल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. वनप्लस 6 टीमध्ये यूजर्सला वनप्लस 6 वाला प्रोसेसर मिळणार आहे. पण बॅटरीबद्दल विचाराल तर येणाऱ्या फोनची बॅटरी पहिल्यापेक्षा चांगली असणार आहे. वनप्लस 6 च्या तुलनेत येणारा स्मार्टफोन पातळ असणार आहे. रॅम आणि स्टोरेजमध्ये कोणता बदल दिसणार नाही. वनप्लस 6 T मध्ये कंपनी 6.4 इंच AMOLED डिस्प्ले देत आहे.  खूप चांगल्या फिचर्ससोबत याची किंमतही जास्त असणार आहे.