मुंबई : लॉन्चिंगच्या पाच दिवस अगोदर OnePlus 7 आणि OnePlus 7 Pro या बहुप्रतिक्षित स्मार्टफोनची वैशिष्ट्य लीक झालीत. हा स्मार्टफोन भारतात 14 मे रोजी लॉन्च होणार आहे. लॉन्चिंगपूर्वी या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स, फिचर्स आणि किंमतीचा खुलासा झालाय. उल्लेखनीय म्हणजे, बाजारातील वनप्लसची ओळख 'थोड्या किंमतींत जास्त फिचर्स' अशीच आहे. परंतु, OnePlus 7 आणि OnePlus 7 Pro या स्मार्टफोन्समुळे कंपनीची ही ओळख आता बदलणार आहे.


OnePlus 7 Pro चे स्पेसिफिकेशन्स


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या स्मार्टफोनमध्ये पॉप अप सेल्फी कॅमेरा देण्यात आलाय. याशिवाय ट्रिपल रिअर कॅमेरेही लावले गेलेत. या स्मार्टफोनला नॉच लेस डिस्प्लेही आहे. 


या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आलाय. याचं रिजॉल्युशन 3120 x 1440 पिक्सल आहे. हे एन्ड्रॉईड 9.0 वर काम करतं. तीन वेरिएन्ट 6 जीबी + 128 जीबी, 8 जीबी + 256 जीबी तसंच 12 जीबी + 256 जीबी मध्ये स्मार्टफोन लॉन्च करण्यात आलाय. 


या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 ऑक्टा SoC प्रोसेसरचा वापर करण्यात आलाय. गेमिंगसाठी 640 Adreno GPU चा वापर करण्यात आलाय.


काय आहे किंमत?


OnePlus 7 Pro च्या 12 जीबी + 128 जीबी वेरिएन्टची किंमत 57,999 रुपये असेल. 


6GB+128GB: ₹ 49,999


8GB+256GB: ₹ 52,999


12GB+256GB: ₹ 57,999



ट्रिपल रिअर कॅमेरा  48MP+16MP+8MP कॅमेऱ्याचा वापर यात करण्यात आलाय. सेल्फी कॅमेरा 16 मेगापिक्सलचा आहे. या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सरचा पर्यायही देण्यात आलाय. या स्मार्टफोनमध्ये 4000 mAh ची बॅटरी उपलब्ध आहे.