OnePlus Nord CE 3 Lite 5G Best Offer:  सध्या डिजिटलच्या युगात ऑनलाईन खरेदी केल्यानंतर त्या वस्तू किफायतशीर मिळत आहे. मोबाईल असो किंवा कोणतीही मोठी वस्तू ऑनलाइन खरेदी केल्यास त्यात आपल्याला चांगली सूट मिळते. यात भर म्हणजे OnePlus च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी असून कंपनीने नुकताच OnePlus Nord CE 3 Lite लाँच केला होता. मात्र हा फोन खरेदीसाठी बाजारात उपलब्ध नव्हता. आज मात्र ग्राहकांची प्रतीक्षा संपली असून आज (11 एप्रिल 2023) दुपारी 12 वाजल्यापासून फोन विक्रीसाठी बाजारात उपलब्ध होणार आहे. या फोनची किंमत किती असणार आहे? या फोनवर ऑफर आणि डिल्स आणि या फोनची वैशिष्ट्ये काय असतील? सविस्तर जाणून घ्या... 


या फोनची वैशिष्ट्य


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 Nord CE 3 Lite 5G मध्ये 6.72-इंचाचा IPS LCD डिस्प्ले FHD + रिझोल्यूशनसह असेल. हँडसेटमध्ये स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर उपलब्ध आहे. 8GB रॅमसह येईल. तर स्टोरेज डिवाइस 256GB पर्यंत असेल.


OnePlus Nord CE 3 Lite 5G ची  किंमत


या स्मार्टफोनची 8GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे. तर 8GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे. हँडसेट दोन रंग पर्यायांमध्ये असून यामध्ये क्रोमॅटिक ग्रे आणि पेस्टल लाइम हे दोन रंग उपलब्ध असणार आहे. या फोनची विक्री Amazon.in, OnePlus च्या अधिकृत वेबसाइट आणि ऑफलाइन स्टोअर्सवर दुपारी 12 वाजता सेलसाठी उपलब्ध होईल. 


या फोनवर ऑफर्स


तसेच Nord CE 3 Lite वर ICICI बँक कार्डवर 1000 रुपयांची सूट मिळेल. यासोबतच कंपनी मोफत OnePlus Nord Buds देखील देत आहे. एवढेच नाही तर हँडसेटसोबत वनप्लस नॉर्ड वॉचच्या खरेदीवर 1000 रुपयांची सूट देखील देण्यात आली आहे.


या फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी 67W SuperVOOC चार्जिंग सपोर्टसह येते. स्मार्टफोनला 108MP प्राथमिक लेन्स, 2MP डेप्थ सेन्सर आणि 2MP मॅक्रो लेन्स मिळतील. फ्रंटमध्ये कंपनीने 16MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. हे उपकरण Android 13 वर आधारित Oxygen OS 13.1 वर कार्य करते.