मुंबई: महागडे स्मार्टफोन निर्माण करणारी वन प्लस कंपनी देशभरात इंजिनिअरिंगमध्ये मोठी भूमिका बजावून देशामध्ये नवकल्पना वाढवण्याची इच्छा व्यक्त करत आहे.  कंपनीची आशा आहे की, पुढील ३ वर्षात कंपनीचा भारतात सर्वात मोठा संशोधन आणि विकास केंद्र असेल. अलिकडेच कंपनीने हैदराबादमध्ये केंद्र स्थापन केले आहे. वन प्लस कंपनीची शेन्झेन, तैवान आणि अमेरिकेत अशीच केंद्रे आहेत. कंपनीची आर.एन.डी टीममध्ये ७०० लोकांचा समावेश आहे. वन प्लसचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पेटे लाऊ यांनी पीटीआयला सांगितले की, 'आम्ही भारताला कंपनीसाठी जागतिक प्रतिभा केंद्र बनवू इच्छितो.' 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वन प्लस कंपनीने सांगितले की, 'हे विचार दीर्घकालीन दृष्टीकोनाचा भाग आहे. आम्हाला फक्त सर्वोत्कृष्ट प्रतिभा जोडुन त्यांना प्रशिक्षित करायचं आहे. त्याचबरोबर मोठया कालावधीसाठी भारताबरोबर काम करायचं आहे'. पुढील तीन वर्षात वन प्लस कंपनी मोठा संशोधन केंद्र उभारण्याची तयारी दाखवत आहे.


ते म्हणाले की, 'सर्वोत्कृष्ट प्रतिभाच्याशोधासाठी आयआयटी सारख्या टॉप इंजिनियरिंग महाविद्यालयाच्या संपर्कात आहे.वर्तमानात त्यांचाकडे भारतातील आर अॅण्ड डी टीममध्ये १०० लोकांचा समावेश आहे. लाऊ म्हणाले, "आम्ही आर्टिफिशियल मेधा (एआय)सारख्या सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञानावर लक्षकेंद्रित करीत आहोत". त्यांनी भारताच्या आर अॅण्ड डी टीम मध्ये किती लोकांना समाविष्ट केले जातील हे सांगण्यास नकार दिला.