मुंबई : ऑनलाईन शॉपिंगचं (Online Shopping) प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलंय. घरपोच सेवा, परवडणारे दर आणि रिपल्समेंट या सुविधांमुळे अनेकांचा कळ हा ऑनलाईन शॉपिंगकडे असतो.  ग्राहकांना ऑनलाईन मागवलेल्या वस्तूचं बिल हेऑनलाईन किंवा कॅशस्वरुपात देता येतात.  मात्र आता तुम्ही जर कॅश ऑन डीलिव्हरी देत असाल, तर तुमच्यासाठी अतिशय वाईट बातमी आहे. (online e commerce website flipkart hike rate of  cash on delivery)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फिल्पकार्टने आपल्या कॅश ऑन डिलीव्हरीचे चार्जेस (Flipkart Charges Hike) वाढवले आहेत. त्यामुळे आता फ्लिपकार्टवरुन शॉपिंग करताना कॅश ऑन डिलीव्हरी ऑप्शन निवडत असाल, तर तुम्हाला खिसा हलका करावा लागणार आहे.


किती रुपयांनी वाढ? 


कॅश ऑन डिलीव्हरीसाठी आता ग्राहकांना जास्तीचे 5 रुपये द्यावे लागणार आहेत. ही रक्कम फार जास्त नसली तरी खिसा हलका नक्कीच करावा लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये काही प्रमाणात नाराजीचं वातावरण आहे.