Vodafone यूझर्ससाठी अलर्ट! या नंबरवरून आलेला फोन चुकूनही उचलू नका
तुम्हाला पण नाही ना आला असा फोन! आताच व्हा सावध कंपनीने दिला हा इशारा
मुंबई: सध्या मोठ्या प्रमाणात ऑनलाइन बँकिंग किंवा इतर ऑनलाइन सेवा वाढल्यामुळे फसवणूक करण्याचं प्रमाणही वाढलं आहे. नुकतंच यासंदर्भात एअरटेलनंही अलर्ट जारी केला होता. आता त्यापाठोपाठ वोडाफोन-आयडियाने देखील आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे.
वोडाफोन आयडिया वापरकर्त्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. सायबर गुन्हेगार व्होडाफोन वापरकर्त्यांचा वैयक्तिक डेटा चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे. व्होडाफोनने आपल्या वापरकर्त्यांना यासंदर्भात इशारा दिला आहे.
वोडाफोनने आपल्या वापरकर्त्यांना इशारा दिली आहे की सायबर गुन्हेगार KYC द्वारे तुमचा वैयक्तिक डेटा चोरीला जाण्याची शक्यता आहे. म्हणून सावध राहा असंही सांगितलं आहे.
वोडाफोन आयडियाने जारी केलेल्या निवेदनात असं म्हटले आहे की ग्राहकांना अनोळखी क्रमांकावरून कॉल येत आहेत. हे नंबर ग्राहकांना KYC व्हेरिफिकेशन झालं नाही तर ते करा अन्यथा तुमची सेवा बंद होईल असं सांगण्यात येत आहे. 24 तासांत केव्हायसी न केल्यास तुम्हाला अनेक समस्या येतील असंही सांगून तुमचे सर्व डिटेल्स मागवले जात आहे.
तुमचे कोणतेही डिटेल्स अशा नंबरवरून कॉल आलेल्या व्यक्तीला देऊ नका असं आवाहन वोडाफोन-आयडियाच्या कंपनीकडून करण्यात आलं आहे. हा युझर्सना फसवण्यासाठी रचलेला सापळा आहे. त्यामुळे अशा फोनकडे दुर्लक्ष करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
हॅकर्स तुम्हाला केवायसी अपडेट करण्यासाठी गुगल प्ले स्टोरवर एक क्विक सपोर्ट अॅप डाऊनलोड करायला सांगतात. त्यानंतर ते इन्स्टॉल करून आपल्या फोनचा अॅक्सिस घेतात आणि त्यानंतर तुमच्या खात्यातून पैसे काढून घेतात. त्यामुळे वेळीच सावध व्हा असा इशारा मोबाईल कंपन्यांनी दिला आहे.
कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी
- अनोखळी नंबरवरून आलेल्या कॉलवरून जो व्यक्ती तुम्हाला केवायसीसाठी विचार आहे त्यावर विश्वास ठेवू नका
-कॉल आल्यानंतर लगेचच यासंदर्भात कस्टमर केअरला त्याची माहिती द्या
-अनोळखी कॉलसोबत कोणताही ई मेलआयडी, फोन नंबर, पत्ता किंवा आधार कार्डचे डिटेल्स किंवा फोन अथवा बँक कार्डची माहिती देऊ नका
-कोणताही मेसेज तुम्हाला आल्यास त्या लिंकवर क्लीक न करता आधी तो मेसेज तपासून घ्या