Cash on Delivery Fraud: तुम्हीही ई-कॉमर्स साइटवरून (e-commerce sites) खरेदी करत असाल, तर गेल्या काही काळात सायबर गुन्हेगारांचे प्रमाण देखील वाढले आहे. डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असल्याने सायबर भामटे सध्या सर्वसामान्य नागरिकांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक करण्यासाठी नवनवीन युक्त्या शोधत आहेत. दरम्यान नजफगडमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला काही दिवसांपूर्वी फोन आला आणि सांगितले. तुमचं पार्सल आलेलं आहे. त्याचे कॅश ऑन डिलिव्हरीमधून पेमेंट करायचे आहे. पण या व्यक्तीने कोणत्याही प्रकारची ऑनलाईन ऑर्डर दिली नसता त्याच्या दरवाजात नेमकी कोणती कॅश ऑन डिलिव्हरीची ऑर्डर आली? अश्या अनेक मार्गातून सामान्य नागरिकांची फसवणूक केली जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. ऑनलाईन डिलिव्हरीतून फसवणूक


सायबर गुन्हेगार फसवणुकीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना नजफगडमध्ये राहणाऱ्या पंकज सिंह यांना काही दिवसांपूर्वी फोन आला होता. फोन करणाऱ्याने सांगितले की, सर, मी तुमच्या घराबाहेर पार्सल घेऊन उभा आहे. पंकजने कोणतेही ऑनलाइन शॉपिंग केले नव्हते, परंतु या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तो खाली गेला. डिलिव्हरी बॉयला विचारले असता त्याने सांगितले की, तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये (Cash on Delivery) काहीतरी बुक केले आहे. या ऑर्डरसाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील. मी असा कोणतीही ऑर्डर दिलेली नाही, असे म्हणत ती ऑर्डर रद्द करा, असे पंकजने स्पष्टपणे सांगितले. नाटक करत असताना डिलिव्हरी बॉयने कस्टमर केअरला फोन करून पंकजला बोलायला लावले. संभाषणादरम्यान, कॉलवर उपस्थित असलेल्या व्यक्तीने पंकजला सांगितले की ऑर्डर रद्द केली जाईल, परंतु या प्रक्रियेसाठी तुम्हाला मोबाइलवर प्राप्त झालेला ओटीपी सांगावा लागेल. पंकज त्याच्या बोलण्यात आला आणि त्याने कॉलवर असताना त्या व्यक्तीला ओटीपी सांगितला. यानंतर तुमची ऑर्डर रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. डिलिव्हरी बॉयही तिथून निघून गेला. पंकज पुन्हा त्याच्या खोलीत आला. मात्र याच दरम्यान बँकेतून त्याच्या मोबाईलवर एक मेसेज आला. ज्यामध्ये खात्यातील सर्व पैसे काढण्यात येणार होते. मेसेज पाहून त्याच्या होश उडाले. 


वाचा : उपांत्य फेरीत पराभवानंतर Rohit Sharma चे कर्णधारपद धोक्यात, या खेळाडूला दिले जावू शकते टी-20 चे कमान 


2. EMI साठी पोलीस अधिकारी बनून फसवणूक 


हे ठग आता पोलीस अधिकारी बनून प्रलंबित ईएमआयसाठी (EMI) ग्राहकांना बोलावून त्यांची फसवणूक करतात. अलीकडेच, दिल्लीतील पालम विहार पोलिस स्टेशनचे एसएचओ म्हणून ठगांनी एका व्यक्तीला फोन केला आणि सांगितले की तुमची ईएमआय बाकी आहे. कंपनीच्या बाजूने आमच्याकडे तक्रार आली आहे. तुमचा EMI ताबडतोब भरा, अन्यथा आम्ही गुन्हा दाखल करू. यानंतर त्या बनावट एसएचओने त्या व्यक्तीला नंबर दिला आणि सांगितले की तो वकील आहे, त्याच्याशी बोल. त्याने त्या नंबरवर फोन केला असता समोरच्या व्यक्तीने स्वत:ला वकील सांगून पैसे ट्रान्सफर करून घेतले.


- या गोष्टी लक्षात ठेवा


- जर कोणी तुमच्याकडे ऑनलाईन ऑर्डर घेऊन आलं असेल तर त्याच्याकडे पहिला पुरावा मागवा. तसेच तुमच्या बाजूने पुरावा दाखवा की तुम्ही कोणतीही ऑर्डर दिली नाही. तुम्ही मोठ्या शॉपिंग वेबसाइट किंवा अॅपच्या पेजला भेट देऊन ऑर्डर दिली नाही हे दाखवू शकता.


- जर तुमच्या घरात कोणी चुकून ऑर्डर दिली असेल आणि तुम्हाला ती वस्तू घ्यायची नसेल तर ती रद्द करण्यासाठी तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. जर तुम्हाला ते पॅकेट मिळाले नाही, तर ते आपोआप परत जाईल आणि रद्द होईल.


- कोणतीही ऑर्डर रद्द करण्यासाठी पाठवलेला OTP शेअर करू नका.


- ऑर्डर रद्द करण्याबाबत असो किंवा इतर काहीही असो. कॉल करत असताना प्राप्त झालेला कोणताही OTP-संबंधित संदेश वाचा. वास्तविक, ठग अनेकदा कॉलवर असताना लक्ष विचलित करतात आणि तुम्ही लगेच OTP सांगता.


- कर्ज किंवा ईएमआय पेंडिंग संदर्भात असा कॉल असल्यास, ज्यामध्ये समोरची व्यक्ती स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे सांगत असेल. तर प्रथम त्या नंबरची पडताळणी करा. तुम्ही स्थानिक पोलिस स्टेशनला कॉल करून नंबरची पडताळणी देखील करू शकता.


- याशिवाय अशा धमकीच्या कॉलला घाबरू नका. अशा प्रकरणात थेट कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना नाही. बँकेकडे फक्त कोर्टाचा पर्याय शिल्लक आहे, त्यातही तुम्हाला तुमची बाजू मांडण्याची संधी दिली जाते.