मुंबई : ओप्पो एफ 19 प्रो सिरीज (OPPO F19 Pro series) अंतर्गत दोन स्मार्टफोन लॉन्च केल्यानंतर आता चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी ओपीपीओने आणखी एक फोन आणलाय. 6 एप्रिलला ओप्पो एफ 19 (OPPO F19) लाँच करण्यास पूर्णपणे तयार आहे. ओप्पो एफ 19 33 वॉट फ्लॅश चार्जसह 5000 एमएएच बॅटरीसह फुल एमोलेड फुल एचडी प्लस पंच होल डिस्प्लेसह सुसज्ज आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओप्पो एफ 19 हा 33 वॉट फ्लॅश चार्जमुळे अवघ्या 72 मिनिटांत चार्जिंग पूर्ण होईल. हे 11 व्ही 3 ए सोल्यूशनवर चालते असा दावा कंपनीने केलाय. ओप्पो एफ 19 फॅशनेबल आणि स्टाइलिश स्मार्टफोन शोधत असलेल्या तरुणांसाठी डिझाइन केला गेलाय. 
 
फ्लॅश चार्जिंग सोल्यूशन्स आणि नवीनतम ऑफरिंगचा विचार केलाय. कंपनीने अलीकडेच एफ 19 प्रो प्लस 5 जी आणि एफ 19 प्रो बाजारात आणला आहे. जो भारतीय बाजारात क्वाड रियर कॅमेरा आणि सुपर अमोलेड डिस्प्लेसह उपलब्ध आहे.



ओप्पो एफ 19 प्रो प्लसच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 25,990 रुपये आहे. त्याचबरोबर ओप्पो एफ 19 प्रोच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 21,490 रुपये आहे. या मॉडेलच्या 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 23,490 रुपये आहे.


त्याशिवाय एप्रिल-जूनच्या दुसर्‍या तिमाहीत ओप्पो आपला पहिला फोल्डेबल फोन बाजारात आणण्याच्या विचारात आहे. जीएसमारेना अहवालानुसार, हे फोल्डेबल डिव्हाइस असेल. ओप्पो व्यतिरिक्त, शाओमी, विवो आणि अगदी गूगल देखील 2021 मध्ये फोल्डेबल डिव्हाइस देऊ शकते. सॅमसंग त्यांच्यासाठी फोल्डेबल ओएलईडी डिस्प्ले पॅनेल विकसित करण्यावर काम करत आहे.


द अलेकच्या अहवालानुसार, ओप्पोमध्ये क्लॅमशेल डिझाइन देण्यात येणार आहे. जो वरपासून खालपर्यंत दुमडेल. अनफोल्ड केल्यास त्याचा डिस्प्ले 7.7 इंचाचे होईल. तर बाहेरची स्क्रीन 1.5 ते 2 इंच इतकी असू शकते.