६ जीबी रॅमचा हा स्मार्टफोन ५ मिनिटांत होईल चार्ज
स्मार्टफोन बनवणारी कंपनी ओप्पोने या आठवड्याच्या सुरुवातीला एफ३ प्लसचे ६ जीबी मॉडेल भारतात लाँच केले होते. आता या स्मार्टफोनची विक्रीही सुरु झालीये. या फोनची किंमत २२,९९० रुपये आहे.
नवी दिल्ली : स्मार्टफोन बनवणारी कंपनी ओप्पोने या आठवड्याच्या सुरुवातीला एफ३ प्लसचे ६ जीबी मॉडेल भारतात लाँच केले होते. आता या स्मार्टफोनची विक्रीही सुरु झालीये. या फोनची किंमत २२,९९० रुपये आहे.
हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवर ३ हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त एक्सचेंज डिस्काऊंट, नो कॉस्ट ईएमआयसारख्या ऑफर्स सुरु आहेत. एचडीएफसी बँकेच्या डेबिड आणि क्रेडिट कार्डावरुन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अतिरिक्त ५ टक्क्यांची सूट दिली जाणार आहे.
या स्मार्टफोनचे फीचर्स
१.९५ गिगाहर्टझ ओक्टाकोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६२५ प्रोसेसर
ड्युअल फ्रंट कॅमेरा १६ आणि ८ मेगापिक्सेल
४०००एमएएच बॅटरी
कंपनीच्या मते हा फोन ५ मिनिटे चार्ज केल्यास पुढील दोन तासांचा टॉकटाईम देऊ शकतो.