25 MP सेल्फी कॅमेरा असलेला ओप्पो F7 लॉन्च, पाहा किंमत आणि फिचर्स
तुम्ही मोबाईल खरेदी करण्याच्या तयारीत आहात? तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण, Oppo कंपनीने आपला एक नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. आयफोन 10 सारखा लूक असलेला Vivo V9 हा स्मार्टफोन गेल्या आठवड्यात लॉन्च करण्यात आला. आता त्याच लूकमध्ये ओप्पोने F7 हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे.
नवी दिल्ली : तुम्ही मोबाईल खरेदी करण्याच्या तयारीत आहात? तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण, Oppo कंपनीने आपला एक नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. आयफोन 10 सारखा लूक असलेला Vivo V9 हा स्मार्टफोन गेल्या आठवड्यात लॉन्च करण्यात आला. आता त्याच लूकमध्ये ओप्पोने F7 हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे.
ओप्पोचा हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 2 एप्रिलपासून ऑनलाईन सेलच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. हा फोन सिल्वर आणि सोलर रेड रंगांत उपलब्ध आहे. तसेच याचा डायमंड ब्लॅक कलर एडिशनही लॉन्च करण्यात आला आहे.
Oppo F7 चे फिचर्स
ओप्पो F7 या स्मार्टफोनच्या स्क्रिनवर आयफोन 10 प्रमाणे टॉपवर नॉच आहे. याच्या रियर कॅमेऱ्यावर ग्लॉसी फिनिशसोबत फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.
स्पेसिफिकेशन्स
स्पेसिफिकेशनचं बोलायचं झालं तर Oppo F7 फोनमध्ये 6.23 इंचाचा सुपर फुल स्क्रिन डिस्प्ले फुल एचडी प्लसमध्ये देण्यात आला आहे. याचा अॅस्पेक्ट रेश्यो 19:9 आहे. फोनमध्ये मीडियाटेक हिलियो P60 ऑक्टा-कोअर प्रोसेसर सोबत 4GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. यासोबतच 128GB मॉडलमध्ये 6GB रॅमही देण्यात आला आहे.
कॅमेरा
ओप्पोच्या या फोनमध्ये 25MP चा सोनी IMX576 सेंसर फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये AI टेक्नोलॉजी 2.0 आहे. कंपनीने दावा केलाय की, ही टेक्नोलॉजी 296 फेशियल फिचर्स ओळखते आणि यामुले बेस्ट सेल्फी क्लिक होतो. कॅमेऱ्यासाठी एक वेगळी एचडीआर सोनी चिपही देण्यात आली आहे. फोनमध्ये 16MP चा सेंसरही देण्यात आला आहे.
फोनची किंमत...
कंपनीने हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला आहे. 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 21,990 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 128 GB स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत 26,990 रुपये ठेवण्यात आली आहे.
बॅटरी
फोनला पावर देण्यासाठी 3400 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने दावा केला आहे की, हा फोनमध्ये 33.5 तास म्युझिक प्लेबॅक, 13.4 तास व्हिडिओ प्लेबॅक आणि 8.3 तास गेम प्ले साठी वापरता येऊ शकतो.