Oppo Find N2 Flip : तुम्ही जर दमदार फीचर्ससह येणारा नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी स्वस्तात मस्त फोन बाजारात उपलब्ध झाला आहे. भारतीय बाजारात एकापेक्षा एक भन्नाट स्मार्टफोन लॉंच झाला आहे. कारण बाजारात आज (13 मार्च) Oppo Find N2 Flip चा फोन लॉंच होणार आहे. Oppo हा फोन Samsung Galaxy Z Filp शी टक्कर देणारा आहे. कारण सॅमसंगचा हा फोन देखील ओप्पोच्या तोडीसतोड आहे. ओप्पोने ट्विटरवर याबाबतची घोषणा केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Oppo Find N2 Flip फोनची पहिली विक्री ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर सुरू होईल. तसेच आज (13 मार्च) या फोनची किंमत जाहीर करणार आहे. त्यामुळे आजपासूनच तुम्ही हा फोन बुक करू शकता. या फोनचे हटके डिझाईन असलेला Oppo चा हा फोन दोन डिस्प्लेला सपोर्ट करतो. याची फक्त स्टाईलचं शानदार नाही तर फोनचे स्पेसिफिकेशन्स देखील जबदरदस्त आहेत. अॅडव्हान्स फीचर असलेल्या Oppo Find N2 Flip स्मार्टफोनची किंमत आणि फिचर्सची माहिती जाणून घ्या. 


Oppo Find N2 Flip चे वैशिष्ट्ये


  • Oppo ने हा स्मार्टफोन पॉकेट फ्रेंडली बनवला आहे.

  • Oppo Find N2 Flip हा 6.8-इंच फोल्डेबल, AMOLED डिस्प्ले मिळेल.

  • फोनमध्ये LTPO FHD + रिझोल्यूशन आणि 120HZ चा रिफ्रेश दर 

  • स्क्रीनच्या सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चे प्रोटेक्शन


वाचा: पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जाहीर  


Oppo Find N2 Flip ची दुसरी स्क्रीन


  • Oppo Find N2 Flip मधील दुसरी स्क्रीन 3.26 इंच 

  • रीफ्रेश दर 60HZ आणि 382 x720 पिक्सेलचा रिझोल्यूशन

  • Oppo च्या या स्क्रीनला 900 nits चा पीक ब्राइटनेस मिळेल.


Oppo Find N2 फ्लिप चा कॅमेरा


  • Oppo च्या या फोनमध्ये 50MP Sony IMX890 प्राइमरी सेन्सर आहे.

  • 8MP अल्ट्रा व्ह्यू कॅमेरा उपलब्ध असेल.

  • सेल्फीसाठी, या फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा मिळेल. 

  • जे MariSilicon X इमेजिंग NPU फीचरसह येईल.

  • या Oppo फोनची पहिली सेल 17 मार्चपासून ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर सुरू होईल.