मुंबई: अनेकदा प्रवाशांना रेल्वे (Railway) प्रवासापुर्वी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. ट्रेनची वाट पाहत असताना ती नेमकी कोणत्या प्लॅटफॉर्म येईल याची माहिती नसते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असते. प्रवाशांची हीच गैरसोय दूर करण्यासाठी पेटीएमने (Paytm) अॅपचे नवे फीचर आले आहेत. त्यामुळे कोणीही आता पेटीएम अॅपचा (Paytm App) वापर करुन ट्रेन कुठेपर्यंत पोहचली आहे, हे कळणार आहे. (Paytm New Feature)    


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Paytm ने अनेक नवे बदल केले आहेत. ट्रेन प्रवाशांसाठी, पेटीएम ट्रेन तिकीट बुक करण्यासाठी नवे फिचर सुरू करत आहे. आता या सुविधांमध्ये आणखी विस्तार केला आहे. प्रवासी आता पेटीएम (Paytm Live Train Status) वर त्यांच्या प्रवासाची PNR स्थिती ट्रॅक करू शकतात. यासाठी पेटीएम (Paytm) वापरकर्त्यांना अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर अॅप अपडेट करावे लागणार आहे. अपडेट केल्यानंतर अॅप ओपन करुन स्क्रोल करा. शोधण्यासाठी अॅपमधील सर्ज फंक्शनमध्ये जावून शोधू शकता. 


असं बघा पेटीएमवरुन ट्रेनचे लाईव्ह स्टेटस


– पेटीएम अॅपवर जा आणि ट्रेनची स्थिती शोधा.


– पेटीएम ट्रॅव्हल विभाग उघडेल, ज्यामुळे तुम्ही ट्रेन, बस, फ्लाइट इत्यादी ट्रॅक करू शकता.


– तुम्हाला ‘ट्रेन’ पर्याय निवडावा लागेल. येथे तुम्हाला PNR स्टेटस, लाइव्ह ट्रेन स्टेटस, ट्रेन कॅलेंडर आणि ऑनलाइन जेवण ऑर्डर करण्याचा पर्याय मिळेल.


– तुम्ही ट्रेन नंबर इनपुट करू शकता आणि सर्च फंक्शनवर टॅप करू शकता.


– एकदा आपण माहिती प्रविष्ट केल्यानंतर, अॅप आगमन स्टेशन, शेवटचे पास स्टेशन, प्रवासासाठी शिल्लक वेळ, प्लॅटफॉर्म तपशील, आगमन आणि प्रस्थान वेळा आणि अपेक्षित आगमन वेळ यासह सर्व प्रवास तपशील दर्शवेल.


– त्याचप्रमाणे, तुम्ही तुमच्या तिकीट बुकिंगची स्थिती तपासण्यासाठी तुमचा पीएनआर नंबर इनपुट करू शकता.


– तुम्ही ट्रेन कॅलेंडर देखील पाहू शकता, ज्यामध्ये तुम्ही एका आठवड्यात ट्रेन धावण्याचे दिवस आणि सर्व वर्गातील जागांची उपलब्धता पाहण्यास सक्षम असाल.