Paytm  Discounts Offer : सध्या शाळांना सुट्टी पडली आहे. मुलांना घेऊन तुम्ही फिरण्याचा बेत आखत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली बातमी आहे. प्रवास तिकीट काढल्यानंतर तुम्हाला डिस्काऊंट मिळाले तर? हो ! आता शक्य होणार आहे. पेटीएमने प्रवास तिकिटावर डिस्काऊंटची ऑफर लागू केली आहे. पेटीएम पेमेंट अ‍ॅप यूसर्सना तिकीट बुक करण्यासाठी ऑफर देऊ केली आहे. पेटीएम ट्रॅव्हल कार्निव्हल सुरु करण्याची घोषणा केली आहे. या सेलमध्ये, वापरकर्ते उन्हाळी सुट्टीच्या हंगामासाठी पेटीएम अ‍ॅपद्वारे विमान, रेल्वे आणि बस तिकिटे बुक करु शकतील आणि आकर्षक सवलती मिळवू शकतील. ही संधी आज आणि उद्यासाठी असणार आहे.


पेटीएम ट्रॅव्हल कार्निव्हल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जे विमानाने प्रवास करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी चांगली बातमी आहे. IndiGo, SpiceJet, GoFirst, Vistara, Akasa Air, AirAsia आणि Air India या प्रमुख विमान कंपन्या पेटीएम ट्रॅव्हल कार्निव्हलमध्ये सहभागी होणार आहेत. पेटीएम RBL बँक (क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड EMI), येस बँक (क्रेडिट कार्ड), आणि HSBC इंडिया यांच्याकडून बँक ऑफरद्वारे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान तिकीट बुकिंगवर 15 टक्के तात्काळ डिस्काऊंट देत आहे. 


तसेच पेटीएम विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सशस्त्र दलातील जवानांसाठीही विशेष भाडे सवलत देत आहे. यूजर्स आपल्या चांगल्या सोयीसाठी शून्य सुविधा शुल्काची निवड करु शकतात. पेटीएम बस बुकिंगवर 25 टक्के सूट देत आहे आणि निवडक ऑपरेटर्सवर अतिरिक्त 10 टक्के सूट देत आहे.  


पेटीएमकडून सांगण्यात आले आहे की, ते निवडक ऑपरेटर्सवर अतिरिक्त 10 टक्के सूटसह बस बुकिंगवर 25 टक्के सवलत देखील देत आहेत. रेल्वे तिकिटांसाठी, कंपनी UPI द्वारे पेमेंटवर शून्य पेमेंट गेटवे चार्ज घेत आहे. वापरकर्ते पेटीएम अ‍ॅपद्वारे तत्काळ तिकीट बुक करू शकतात. तुमच्या बुकिंगची PNR स्थिती तपासू शकता तसेच रेल्वेचा अधिक माहिती जाणून घेऊ शकता.


 जर यूसर्सना ही ऑफरची योजना आवडली नसेल, परंतु त्यांना तिकीट लॉक करायचे असेल, तर ते 'कॅन्सल प्रोटेक्ट कव्हर' खरेदी करु शकतात, ज्यामुळे त्यांना छुपे शुल्क आणि रद्दीकरण शुल्काशिवाय पेटीएमवर त्यांची विमान, रेल्वे आणि बस रद्द करता येतील. तिकिट रद्द केल्यावर 100 टक्के परतावा मिळणार आहे. हे यूजर्स पेटीएम ट्रॅव्हल कार्निव्हल दरम्यान तिकीट बुक करण्याची आणि नंतर कोणतेही पैसे न कट होता त्यांची सहलीलाच प्लान किंवा रद्द करण्याची संधी देखील देण्यात आली आहे. त्यामुळे तिकीट बुक केले आणि अचानक तुमचा प्रवासाचा बेत रद्द झाला तर आता टेन्शन नाही.


पेटीएम हे ट्रॅव्हल बुकिंगसाठी पसंतीचे ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे आणि इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (IATA) मान्यताप्राप्त ट्रॅव्हल एजंट आहे.