मुंबई : एका संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, 'तुम्हीही रोज दोन तास किंवा त्यापेक्षा अधिक ड्रायव्हिंग करता का? करत असाल तर तुम्हाला ही सवय बदलण्याची गरज आहे. कारण रोज दोन तास किंवा त्यापेक्षा अधिक ड्रायव्हिंग करणाऱ्यांचा आयक्यू कमी होते'.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संशोधक दावा करताना म्हणतात, 'जे लोक जास्त ड्रायव्हिंग करतात, ते सुस्त राहू लागतात. ज्याचा थेट परिणाम मेंदूच्या क्षमतेवर होतो आणि परिणामी आयक्यू लेव्हल कमी होण्यास सुरुवात होते'.


 संशोधनादरम्यान सलग ५ वर्षांसाठी या ५ लाख व्यक्तींच्या जीवनशैलीवर लक्ष ठेवण्यात आलं. सोबतच त्यांची बुद्धीमत्ता आणि स्मृतीही तपासण्यात आली. ३७  ते ७३ या वयोगटातील ५ लाखांपेक्षा जास्त व्यक्तींवर संशोधन करण्यात आलं.


संशोधनातील ९३  हजार व्यक्ती, जे दररोज २ ते ३ तास किंवा त्यापेक्षा अधिक ड्रायव्हिंग करतात, त्यांच्या मेंदूची क्षमता अगोदर कमी होती. मात्र नंतर आयक्यू कमी होण्यास सुरुवात झाली.


एवढं असलं तरी संगणकावर काम करणाऱ्यांची बौद्धीक क्षमता तल्लख असल्याचं समोर आले आहे, मात्र ३ तास टीव्ही पाहणाऱ्यांवर असं एक संशोधन करण्यात आलं होतं. त्यात त्यांची बौद्धिक क्षमता कमी झाल्याचं समोर आलं. हा एका संस्थेचा रिसर्च आहे, या रिसर्चशी झी २४ तास सहमत असेलच असं नाही.