Teacher Success Story: एक भन्नाट कल्पना तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. तुम्हाला यावर विश्वास बसत नसेल तर तुम्ही नक्कीच प्रेरणा झुनझुनवाला यांनी शून्यातून उभ्या केलेल्या 300 कोटींच्या कंपनीची यशोगाथा वाचायलाच हवी. बरं प्रेरणा यांच्या कल्पनेबद्दल सांगायचं झालं तरी ती अगदी जगावेळी कल्पना आहे असंही नाही. मात्र प्रेरणा यांनी ही कल्पना ज्या पद्धतीने वापरली आणि उपलब्ध करुन दिली त्यामुळे आत त्या कोट्यधीश झाल्या असून त्यांच्यावर अगदी पैशांचा पाऊस पडतोय.


आयआयटी, आयआयएममध्ये शिकलेल्या नाहीत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रेरणा झुनझुनवाला या सिंगापूरमध्ये एक प्री-स्कूल चालवतात. या स्कूलचं नाव लिटिल पेडिंगटन असं असून हे सिंगापूरमधील एक प्रसिद्ध शाळा आहे. याच शाळेसंदर्भात प्रेरणा यांनी एक अ‍ॅप तयार केलं आहे. या अ‍ॅपचं व्हॅल्यूएशन सध्या तब्बल 330 कोटी इतकं आहे. आपण ज्या अ‍ॅपबद्दल बोलतोय त्याचं नाव आहे क्रिएटीव्ह गॅलिलिओ. या अ‍ॅपच्या मदतीने 3 ते 8 वर्षांच्या मुलांना मजेदार पद्धतीने शैक्षणिक धडे देता येतात. हे अ‍ॅप्लिकेशन 90 लाखांहून अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आला आहे. गेम्स, व्हिडीओ आणि पर्सनलाइज्ड लर्निंगच्या माध्यमातून मुलांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवण्यासाठी हे अ‍ॅप वापरलं जातं. प्रेरणा यांनी आयआयटी, आयआयएम किंवा इतर कोणत्याही नामांकित व्यवस्थापन अथवा बिझनेस स्कूलमधून शिक्षण घेतलेलं नाही. प्रेरणा अमेरिकेतील न्यूयॉर्क विद्यापीठामधून विज्ञान शाखेतून पदवीधर आहेत.


30 लोक काम करतात


मागील वर्षी प्रेरणा यांनी स्टार्टअपसाठी 4 कोटी डॉलर्स (330 कोटी रुपये) वर 60 कोटी रुपयांचं व्हॅल्यूएशन मिळवलं. आपण या स्टार्टअपच्या मार्केटिंगसाठी काहीही खर्च केला नाही असं प्रेरणा यांचं म्हणणं आहे. माझ्या स्टार्टअपची वाढ ही ऑरगॅनिक पद्धतीने होत आहे, असं प्रेरणा म्हणाल्या. प्रेरणा यांच्या कंपनीमध्ये 30 लोक काम करतात. पुढील वर्षभरामध्ये कंपनीतील कर्मचारी संख्या वाढवून दुप्पट करण्याचा प्रेरणा यांचा मानस आहे. 


7 प्रसिद्ध शाळा घेतात सेवा


प्रियंका झुनझुनवाला यांनी कंपनीचा इंडोनेशिया आणि व्हिएतनामध्ये विस्तार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत असंही सांगितलं. कंपनी स्थानिक भाषांमध्येही कंटेट निर्माण करण्याची तयारी करत आहे. सध्या सिंगापूरमधील 7 प्रसिद्ध शाळा त्यांच्या कंपनीची सेवा वापरतात.


इतर 2 अ‍ॅप्सही चर्चेत


प्रेरणा यांच्या कंपनीचे इतर 2 अ‍ॅप्सही आहेत. या अ‍ॅप्सचं नाव टूनडेमी आणि लिटिल सिंघम असं आहे. हे दोन्ही अ‍ॅप्स एकत्रितपणे 1 कोटींहून अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आले आहेत. भारतामधील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या टॉप 20 अ‍ॅप्समध्ये मुलांसाठी असलेलं हे एकमेव अ‍ॅप आहे.